Join us

बैलगाडाप्रेमी, गोल्डनमॅन म्हणून ओळख असलेले पंढरीशेठ फडके कोण होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:27 PM

बैलगाडा शर्यत हे नाव जरी निघालं की, या आखाड्यात पहिली आठवण येते ती म्हणजे प्रसिद्ध पंढरीनाथ फडके यांची.

- रविंद्र शिऊरकर बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके बुधवारी (दि. २१) रोजी हृदयविकाराने निधन झाले. गोल्डन मॅन म्हणून देखील प्रसिद्ध असलेल्या पंढरी शेठ फडके यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.    

बैलगाडा शर्यत हे नाव जरी निघालं की, या आखाड्यात पहिली आठवण येते ती म्हणजे प्रसिद्ध पंढरीनाथ फडके यांची. त्यांच्या वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडके यांनी राखून ठेवली होती. आत्तापर्यंत अनेक शर्यतींचे बैल त्यांनी राखून ठेवले आहेत.

कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला आणि त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर कितीही किंमत असली तरी ते त्याला विकत घ्यायचे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबैलगाडी शर्यत