राज्यात यंदा खासगी व सहकारी अशा 194 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. हंगाम सुरू होऊन महिना उलटला असून, आतापर्यंत 3 कोटी 40 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 77 लाख टनानी गाळप कमी झाले आहे. राज्यात पाऊस कमी झाल्याने उसाची वाढ होऊ शकली नाही. त्यात परतीचा पाऊसही झाला नसल्याने उत्पादन घटले आहे.
कोल्हापूर, सांगली वगळता राज्यात इतर ठिकाणी गळीत हंगाम वेळेत सुरू झाला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे दोन जिल्ह्यांत हंगाम लांबणीवर पडला. त्याचाही फटका विभागातील कारखान्यांना बसणार आहे. पुणे विभागात 17 सहकारी कारखाने 12 खासगी कारखाने गाळप 77.21 लाख टन इतका आहे. सोलापूर विभागात 17 सहकारी कारखाने 30 खाजगी कारखाने येथील गाळप 74.42 लाख टन इतकं आहे. अहमदनगर जिल्ह्यात 14 सहकारी कारखाने 11 खाजगी कारखाने इथला गाळप 44. 1 लाख टन इतका आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 24 सहकारी कारखाने 13 खासगी कारखाने इथला गाळप 69.94 लाख टन इतका आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 13 सहकारी कारखाने, 09 खासगी कारखाने इथला गाळप 32.23 लाख टन इतका आहे. नांदेड जिल्ह्यात दहा सहकारी कारखाने 19 खासगी कारखाने असून इथला गाळप 38.99 लाख टन इतका आहे. अमरावती जिल्ह्यात दोन खासगी कारखाने आहे. इथला गाळप 3.1 लाख टन इतका आहे. नागपूर जिल्ह्यात तीन खासगी कारखाने असून इथला गाळप 0.62 लाख टन इतका आहे.
उसाचे उत्पादन घटले? यंदा राज्यभरात पावसाचे अत्यल्प असून त्याला शेतीला बसल्याचे पाहायला मिळाले. यात ऊस पिकाला देखील चांगलाच फटका बसला असून त्यामुळे यंदा उत्पादन देखील घटले आहे. त्यामुळे यंदा गाळप देखील कमी होऊ लागले आहे. पावसामुळेच उसाची टंचाई भासू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांना उभ्या उसाची चिंता असल्याने अनेकांनी गुऱ्हाळाला ऊस घातला आहे. अनेक भागांत पावसाअभावी ऊस जळून गेल्याच्याही तक्रारी आहेत. एकूणच यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने ऊस उत्पादन घटले. परिणामी साखर कारखान्यांना देखील ऊसाची टंचाई भासू लागल्याने गाळप कमी येऊ लागले आहे.