२० मे २०१८ पासून जागतिक मधमाशी दिन साजरा करायला सुरुवात झाली. ज्यास कारण होते, जगभरातील मधमाशांची घटत चाललेली संख्या जी चिंताजनक आहे.
मधमाशांचे मानवी आरोग्य आणि पराग कणाबद्दलचे योगदान यांचे स्मरण करण्यासाठी स्लोव्हेनियन सरकारने २०१६ मध्ये राष्ट्रसंघासमोर २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या मागणीला इतर राष्ट्राकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे २०१८ पासून जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो.
मधमाशा, पक्षी आणि वटवाघुळ जगातील ३५ % शेतमालाचे परागीकरण करतात. प्रमुख ८७ पिकांचे परागीकरण मधमाशा मुळे तयार होतात. ज्यामुळे मानवाला अन्नधान्य उत्पादन मिळते. एवढेच नाही तर आहारात वापरल्या जाणाऱ्या दर चार पिकांपैकी तीन पिकांना परागीकरणाची गरज असते. त्यामुळे पराग कणांच्या अवतीभोवती घोगवणाऱ्या मधमाशांचे महत्त्व आज जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ..
आजूबाजूला दिसणारे प्रत्येक पक्षी व प्राणी महत्त्वाच्या असतात. या प्राणी व पक्षांच्या मदतीने जैवविविधता टिकून ठेवण्यास मदत होते. त्यासाठी निसर्गातील लहान मोठ्या सर्व घटकांची मदत होते. फुलपाखरा पासून ते मधमाशी पर्यंत सर्वच निसर्गातील अन्नसाखळीचे चक्र फिरते ठेवत असतात.
आता मधमाशांचे बघा त्या एका फुलातून परागकण गोळा करून दुसऱ्या फुलांमध्ये टाकतात त्यामुळे काय होते तर पोषक अशा फळा फुलांची निर्मिती होते. त्यामुळे मानवाला चांगल्या फळ, बिया आणि पिकांचे उत्पादन घेता येते. आज जगभरातील अनेक जण मधमाशी पालन व्यवसायाकडे वळाले आहेत. मधमाशांच्या पालनामुळे मध तर मिळतोच त्याचबरोबर विविध पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुन्हा पुन्हा उत्पादन घेण्यासाठी मधमाशा महत्त्वाच्या ठरतात.
मधमाशा पालनाकडे व जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी चांगला पर्याय म्हणून पाहिले पाहिजे. त्यामुळे आज जगभर मधमाशी पालनासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. मधमाशांच्या अस्तित्वाला मानवी वर्तनामुळे धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणात मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या प्रजाती नष्ट होण्याचे प्रमाण १०० ते हजार पट अधिक आहे. मधमाशी पालनावर लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे.
लेखक
प्रा.संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.