शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच अनुदान मिळण्यासाठी ई-पीक नोंदणी आवश्यक आहे. पीकविमा काढल्यानंतर मिळण्यासाठी देखील नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. यंदा कमी पावसामुळे शेतकयांच्या पेरण्या विलंबाने झाल्या. याचा परिणाम पिकांच्या नोंदणीवर होत आहे. खरीप व रब्बी दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी दरवर्षी ई-पीक पाहणी पूर्ण करावी लागते.
कधीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार?
१५ ऑक्टोबरपर्यंत शेतकरी पीकपेरा ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. ई-पीक पाहणी स्वतः करायची आहे.
संबंधित वृत्त: ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर
पीकपेरा नोंदणी कशासाठी?
‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेला पेरा थेट शासनाकडे नोंदवला जाणार आहे. कोणत्या पिकाचे किती क्षेत्रावर उत्पादन घेतले आहे, शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे की नाही, राज्यात पीकपेरा किती आदी बाबींची माहिती ही सरकारला मिळते.
पीकपेरा नोंदणे केल्याने होणारे फायदे
- पिकांचे नुकसान झाल्यास ई-पीक पाहणीची नोंद असल्यास नुकसानभरपाई अचूक व लवकर मिळते.
- पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकयांच्या सहभागामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होतो.
- एका मोबाइलवरून ५० पीकपेरा नोंदणी शक्य आहे. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या मोबाइलला नेटवर्क नसेल अथवा इतर कारणाने बंद पडला असेल तर अन्य शेतकऱ्यांच्या मोबाइलद्वारे नोंदणी करू शकतील.
होणारे तोटे
अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. त्यामुळे अनेक वेळा नोंद करताना चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.