Join us

जमिनीची नियमित मशागत का आहे गरजेची; याचा उत्पन्नावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 12:23 PM

जाणून घेऊया जमीन मशागतीचे महत्त्व ....

पिकाच्या उत्तम वढीकरिता जमिनीचा वरील कठीण भाग मशागत साधनांच्या मदतीने तयार करून जमीन भुसभुशीत करणे याला जमिनीची मशागत असे म्हणतात. बागायती किंवा कोरडवाहू शेती मधून उत्पादन मिळविण्यासाठी शेती शाश्वत करणे गरजेचे आहे.

नैसर्गिक साधनसामग्रीमध्ये पाणी हवा , हवामान, जमीन हे महत्त्वाचे घटक आहेत. जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता त्या जमिनीची भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीस फार महत्त्व आहे विशेषतः उन्हाळी मशागतीचे फायदे आहेत. 

जमिनीचा वरील धर कठीण होण्याची महत्त्वाची कारणे

1) शेतीच्या मशागतीसाठी नांगराचा वापर ही तर फार सर्वसाधारण बाब आहे. 

2) पिकाच्या कापणीनंतर लगेचच नवीन पिकाच्या पेरणीसाठी जमीन लवकर तयार करण्याकरिता शेतीमध्ये नांगराचा सतत व सलग काही वर्षे वापर केल्यास जमिनीचा वरचा थर कठीण होत जातो.

3) शेतातील इतर कामाकरिता सध्या अवजड ट्रॅक्टर्स किंवा अवजड अवजारांच्या सतत च्या जमिनीखाली कठीण भाग निर्माण होतो त्यास हार्ड फॅन असे म्हणतात.

4) यात तयार होणाऱ्या हार्ड फॅन मुळे जमिनीतील हवेचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीत पाणी साठवून राहते. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही या सर्वांचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होताना आढळतो. यावर उपाय म्हणून सबसॉयलरचा वापर करावा.

उन्हाळी मशागत कधी व केव्हा करावी?

मशागतीचे उद्देश साध्य होण्यासाठी पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच मशागत फायद्याची ठरते. कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने मशागतीचे काम हलके होते. ढेकळे निघत नाहीत, मशागत खोलवर होते, पूर्वीच्या पिकांचा पालापाचोळा, काडी कचरा जमिनी गाडला जातो व जमिनीस सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होतो.

रब्बी व उन्हाळी पिके काढल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल मध्ये त्वरित नांगरण्या करून घ्याव्यात. हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात. म्हणून एप्रिल ते मे महिन्यात वळवाचा पहिला पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर नांगराव्यात.

उन्हाळ्यामध्ये जमीन मशागत

भारतात तीन ही हंगामात मोठ्या प्रमाणात वर्षभर विविध पिके घेतली जातात. परंतु खरीपखरीप हंगामा त पुरेशा पावसाच्या पाण्याची उपलब्धता असल्याने खरीप मध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली जाते. पावसाळ्यात जमिनी ओल्या होऊन प्रसरण पावतात. आणि उन्हाळ्यात कोरड्या होऊन आकुंचन पावतात. तसेच वर्षभर किती घेऊन जमिनी होतात. म्हणून उन्हाळी मशागत महत्त्वाचे ठरते.

१) जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात कमी होते

जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवणे आवश्यक आहे. खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून तापू दिली पाहिजे. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत सॉइल सोलारिझेशन असे म्हणतात. पूर्वी बैल नांगराणे जमिनीची मशागत व्हायची आता ती ट्रॅक्टर द्वारे केली जाते.

ट्रॅक्टर मदतीने एक ते दीड फूट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ अंश सेल्सिअस तापमान गेले की १५ सेंटिमीटर खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. सध्या तीन ही हंगामात पिके घेत असल्यामुळे जमिनीत सतत ओलावा असतो त्यामुळे बुरशीच्या प्रमाणात वाढ होताना पर्यंत दिसत आहे. परिणामी यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून बरेचदा पीक सुद्धा अति येत नाही. किंवा उत्पादन कमी होते.

२) जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होते 

मातीत ओलावा राहिल्याने सेंद्रिय पदार्थाचे लवकर विघटन होते त्यामुळे अन्नद्रव्य पिकास लवकर उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची हालचाल व वाढ होण्यास मदत होते परिणामी जमिनीचे उत्पादकता वाढते. 

३) जमिनीची इलेक्ट्रिकल कण्डक्टिव्हिटी वाढते

मशागतीमुळे आधीच्या हंगामातील पिकांमुळे घट्ट झालेले मातीचे कण मोकळे होऊन पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत होते. त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही पाऊस पडतो तो खडक जमिनीवरून पटकन वाहून जातो ओल खोलपर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते ते त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते.

इतर महत्त्व

जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पटीने वाढते सूर्यप्रकाशाची गरज जसे प्राणी, मानव वनस्पती यांना असते तशी ती जमीन ला सुद्धा असते . तसेच जमिनीतील पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, यांची घनता वाढते त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो.

लेखक प्रा. संजय बाबासाहेब बडेसहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.

टॅग्स :शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनखरीपशेती क्षेत्रलागवड, मशागत