Lokmat Agro >शेतशिवार > गुळ का खाल्ला पाहिजे? काय आहेत गुळाचे फायदे; वाचा सविस्तर

गुळ का खाल्ला पाहिजे? काय आहेत गुळाचे फायदे; वाचा सविस्तर

Why should jaggery be eaten? What are the benefits of jaggery; Read in detail | गुळ का खाल्ला पाहिजे? काय आहेत गुळाचे फायदे; वाचा सविस्तर

गुळ का खाल्ला पाहिजे? काय आहेत गुळाचे फायदे; वाचा सविस्तर

Jaggery for Health साखरेचा वापर वाढल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले असून, आपल्या आहारातून साखर काढून टाकण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गूळ.

Jaggery for Health साखरेचा वापर वाढल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले असून, आपल्या आहारातून साखर काढून टाकण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गूळ.

शेअर :

Join us
Join usNext

साखरेचा वापर वाढल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले असून, आपल्या आहारातून साखर काढून टाकण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गूळ.

आवड म्हणून साखर खाणे ठीक आहे, पण गरज म्हणून गुळाचा वापर वाढला तर जीवन आरोग्यदायी राहण्यास मदत होते. पण दुर्दैवाने गुळाचं मोठे उत्पादन होत असताना देखील आपल्या चहातून गूळ गायब झाला आहे.

साखर ही शरीराला हानिकारकच आहे, अनेक आजारांचे मूळ हे साखरेतच दडले आहे. तरीही आपण साखर खाणे सोडत नाही. विशेष म्हणजे 'कोल्हापुरी गुळा'ने जगाला भुरळ घातली आहे.

पण येथील नागरिक त्याचा वापर फार कमी प्रमाणात करतात. साखरेच्या चहा ऐवजी गुळाचा चहा रोज घेतला तर तो आरोग्याच्यादृष्टीने अधिक फायदेशीर ठरतो. अलीकडे आहारातील गुळाचा वापर खूप कमी झाला आहे.

ग्रामीण भागही त्याला अपवाद राहिलेला नाही. वर्षातून सणाला केल्या जाणाऱ्या पुरणपोळीमध्ये एवढाच काय तो गुळाचा वापर राहिला आहे. शहरात काही ठिकाणी तर पुरणपोळीत गुळाऐवजी साखरेचाच वापर केला जातो.

पूर्वी पाहुणा घरी आला की चहा, सरबत ऐवजी गूळ शेंगा दिल्या जायच्या. आरोग्य सुदृढ ठेवायचे झाल्यास आपल्या रोजच्या जीवनात साखरेचे प्रमाण कमी करून गुळाचा सहभाग वाढविण्याची गरज आहे.

गूळ हृदयरोगासाठी एकदम उपयुक्त
-
हृदयाच्या आरोग्यासाठी गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
- अत्यावश्यक जीवनसत्त्वे, खनिजे तसेच अँटिऑक्सिडंट्सच्या चांगुलपणाने भरलेले हे नैसर्गिक स्वीटनर आहे.
- गुळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
- गुळ दाहक-विरोधीदेखील आहे आणि रक्ताभिसरण वाढविण्यात मदत करतो.
- सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.
- गुळामध्ये व्हिटॅमिन सी, बी ६ आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. तसेच, यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.
विशेषतः शेतात काम करणाऱ्या महिलांनी रक्त वृद्धीसाठी गुळ खाणे फायदेशीर आहे.

गुळाच्या चहाचे स्टॉल
मोठ्या शहरात आता गुळाच्या चहाचे स्टॉल सुरु झाले आहेत. मात्र, अद्यापही लोकांमध्ये गुळाबाबत फारशी जागृती दिसत नाही. गूळ पिकविणारा शेतकरीही याबाबत सजग नाही.

अधिक वाचा: Urban Farming : सिमेंटच्या जंगलात पापाभाईंनी फुलवली सेंद्रीय परसबाग; घेतायत ३० प्रकारची विविध पिके

Web Title: Why should jaggery be eaten? What are the benefits of jaggery; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.