ऑगस्टमधील २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाच्या खंडामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी २३ जिल्ह्यांमधील सुमारे ४५६ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पहिला निकष लागू होत असला तरी त्यासंदर्भात आता कृषी विभागाने १५ जिल्ह्यांमधील ४२ तालुक्यांमध्ये पिकांची व आर्द्रतेची स्थिती पडताळणीचे काम हाती घेतले आहे. याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केल्यानंतर दुष्काळाची तीव्रता तपासून त्यासंदर्भात घोषणा करण्यात येईल.
जुलैअखेर, तसेच संपूर्ण ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये ४५६ महसूल मंडळात पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला. त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर झाला.
पाच तालुक्यांचा समावेश
लोकमतने याबाबत वृत्तमालिकेतून आवाज उठवला होता. या १५ जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात तालुक्यांचा समावेश आहे. त्याखालोखाल बीड व सोलापूरमधील प्रत्येकी पाच तालुक्यांचा समावेश आहे.
अनेक ठिकाणी हे उत्पादन सरासरीपेक्षा ५० टक्क्यांपेक्षा कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाच्या निकषानुसार राज्य सरकार मदत करत असते. अशीच मदत अवकाळी दुष्काळालादेखील द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती.
जिल्हानिहाय तालुके
- नंदुरबार- नंदुरबार
- बीड-अंबाजोगाई, धारूर, वडवणी
- धुळे- शिंदखेडा
• जळगाव- चाळीसगाव
- लातूर- रेणापूर
• धाराशिव- लोहारा, धाराशिव, वाशी
• बुलढाणा- लोणार, बुलढाणा
• जालना-अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना, मंठा
• सोलापूर - बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला
- छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर, सोयगाव
• नाशिक- मालेगाव, सिन्नर, येवला
• सातारा- वाई, खंडाळा
• कोल्हापूर- हातकणंगले, गडहिंग्लज
- पुणे- बारामती, दौड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हा
- सांगली- कडेगाव, खानापूर, मिरज, शिराळा