Lokmat Agro >शेतशिवार > पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीचे विषय कायम राहणार का? वाचा काय झाला निर्णय

पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीचे विषय कायम राहणार का? वाचा काय झाला निर्णय

Will the subjects of the Fifth Dean's Committee remain in the Animal Husbandry and Dairy Science degree course? Read what was the decision | पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीचे विषय कायम राहणार का? वाचा काय झाला निर्णय

पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीचे विषय कायम राहणार का? वाचा काय झाला निर्णय

Agriculture University Syllabus : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र अभ्यासक्रम ८ श्रेयांक भारांचा होता. परंतु राज्यामधील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सहाव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहे.

Agriculture University Syllabus : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र अभ्यासक्रम ८ श्रेयांक भारांचा होता. परंतु राज्यामधील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सहाव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र अभ्यासक्रम ८ श्रेयांक भारांचा होता. परंतु राज्यामधील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सहाव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहे. यामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र हा पदवी अभ्यासक्रम केवळ २ श्रेयांक भारांचा होता.

सदर अभ्यासक्रमास महत्व देण्याच्या दृष्टिकोनातून पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र हा अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच ८ श्रेयांक भारांचा असावा, या मागणीसाठी दि.६ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद भोसलेनगर, पुणे येथे कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. 

या पार्श्वभूमीवर कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सामोरे जावून चर्चा केली व पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग या विषयाचे महत्व विषद केले. बदलत्या हवामानानुसार हा विषय अतिशय महत्वाचा आहे. या विषयाशिवाय कृषी शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही, असे नमूद केले.

ज्यात आंदोलन करणाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. तसेच अधिष्ठाता समन्वय समिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे अध्यक्ष डॉ. एस. एस. माने, सदस्य सचिव अधिष्ठाता समन्वय समिती डॉ. ए. एम. देठे, संचालक (शिक्षण) कृषी परिषद पुणे डॉ. वाय. सी. साळे यांचे समवेत चर्चा केली व अतिशय तातडीने बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या.

परिणामी मंगळवार (दि. १४) रोजी सर्व विषयांचे तज्ज्ञ यांची बैठक होऊन कृषी विद्यापीठांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र पदवी अभ्यासक्रम केवळ २ श्रेयांक भारांचा न करता पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीप्रमाणे ८ श्रेयांक भारांचा कायम राखण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा : बनावट पीकविमा प्रकरणी तपासणी सुरू; आतापर्यंत ७२५ ठिकाणच्या बोगस फळबागा उघडकीस

Web Title: Will the subjects of the Fifth Dean's Committee remain in the Animal Husbandry and Dairy Science degree course? Read what was the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.