Lokmat Agro >शेतशिवार > Winter food : हिव्याळ्यात कडधान्य आरोग्यासाठी लाभदायक

Winter food : हिव्याळ्यात कडधान्य आरोग्यासाठी लाभदायक

Winter food: Pulses are beneficial for health in winter | Winter food : हिव्याळ्यात कडधान्य आरोग्यासाठी लाभदायक

Winter food : हिव्याळ्यात कडधान्य आरोग्यासाठी लाभदायक

थंडीच्या काळात कडधान्यांचा आहारात समावेश केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. (Winter food)

थंडीच्या काळात कडधान्यांचा आहारात समावेश केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. (Winter food)

शेअर :

Join us
Join usNext

Winter food : हिवाळ्यात कडधान्याचे सेवन खूप फायदेशीर असते. याच्या सेवनाने शरीराला कोणताही आजार स्पर्श करणार नाही. थंडीच्या काळात कडधान्यांचा आहारात समावेश केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

डाळीच्या धान्याची बहुतेक सर्व पिके इतिहासपूर्व काळापासून लागवडीखाली आहेत. त्यांचे बी भरडल्यास त्याच्यावरील टरफल निघून जाऊन प्रत्येक दाण्याच्या दोन - दोन डाळिंब्या होत असल्यामुळे त्यांना द्विदल धान्ये म्हणतात.

कडधान्यांत उडीद, घेवडा, चवळी, तूर, वाटणा, मटकी, मूग, सोयाबीन, हरभरा आदींचा समावेश होतो. कडधान्ये बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनीत येतात. परंतु चांगल्या जमिनीवर पिकाचे उत्पन्न जास्त येते.

मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असे म्हटले जाते. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये असायलाच हवीत.

मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने कोणते फायदे होतात. सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी, नंतर उडीद आणि हरभरा, कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असतात.

उन्हाळ्यात सगळ्यात गुणकारी ठरणारा 'हा' पदार्थ पोटाच्या समस्याही दूर करतो. मोड आलेली कडधान्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात. मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात 'क' जीवनसत्व असते. मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो.

मोड आणल्यामुळे टॅनीन आणि फायटीक ॲसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो.
मोड आणल्यामुळे कडधान्य हलके होतात आणि सहज पचतात. मोड आलेली कडधान्ये वाळवल्यानंतर त्यातल्या कर्बोदकांचं आणि 'क' जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

भरड धान्याचे हे आहेत फायदे

बाजरी : यामध्ये फॉस्फरस उच्च प्रमाणात असून, ते पेशींमधील ऊर्जा आणि अन्य खनिज पदार्थ साठवण्यास साहाय्य करते. लोहाचेही प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढते.

नाचणी : यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम सर्वाधिक असल्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. लहान मुलांप्रमाणेच वयोवृद्धांना नाचणीचे सत्व उपयुक्त असते. सकस आहारामध्ये नाचणीचा समावेश आहे.

मोड आलेली कडधान्ये खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवणे आवश्यक आहे. - डॉ. प्राजक्ता मसलगेकर, आयुर्वेद तज्ज्ञ

Web Title: Winter food: Pulses are beneficial for health in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.