Join us

करडई तेलाचे उत्पन्न घटले? त्याचा काय होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 3:19 PM

खाद्य तेलांचे का वाढताहेत दर ? काय आहे याची कारणे !

अलीकडे खाद्य तेलांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र यामागील कारणे कुणीचं बघत नाही. शुद्ध आणि नैसर्गिक खाद्य तेल सर्वांना हवं आहे. पण तेलबियांची लागवड करतांना कोणीच दिसून येत नाही. ज्यामुळे मागणी वाढत असून त्या तुलनेत कच्या मालाचा पुरवठा होत नसल्याने दिवसेंदिवस खाद्य तेलांचे दर वाढत आहे. 

खाद्य तेलाच्या दरात दिवसेंदिवस चढ-उतार होत असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कधी कोलमडत आहे ! तर कधी बरोबर होत आहे. करडईच्या तेलाकडे आरोग्यास फायदेशीर असलेले तेल म्हणून पाहिले जाते. पूर्वीपासूनच करडईचे तेल महाग आहे. याचे कारण म्हणजे करडईचा पेरा क्षेत्र अत्यंत कमी होत आहे. 

अलीकडे नगदी पिकांचा पेरा वाढला आहे. ज्यामुळे पारंपरिक तेलबियांचे विक्रमी उत्पन्न घेणारे शेतकरी आता कमी झाल्याचे दिसून येत आहे. पुर्वी गावागावांत तेलघाणे असायचे. परिसरातील शेतकरी आपल्या परीने शेतात तेलबियांची लागवड करत त्यातुन उत्पादित होणार्‍या तेलबियांचे तेल काढून आपल्या स्वयंपाक घरातील वापरात ते तेल वापरत असे. मात्र आता तेलबियांचे उत्पादन कमी झाल्याने जवळपास सगळेच हे तेल विकत घेत आहे. 

सध्या करडईच्या तेलाचा भाव काय?

खाद्य तेलात सर्वात महाग तेल म्हणून करडईच्या तेलाचा भाव आहे. लाकडी घाण्यावरील हे करडई तेल ३१० रुपये किलोने विकले जाते. तर करडईच्या साध्या तेलाचे भाव २३० रुपये किलो आहे. करडईचे क्षेत्र कमी असल्याने भाव वाढलेले दिसून येत आहे.

राज्यात करडई पेरा किती ?

दहा वर्षापूर्वी करडईचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे करडईचे उत्पन्नही अधिक होत असे. त्यामुळे करडई खाद्य तेलाचे भाव अवाक्यात होते. करडई तेलापासून अनेक फायदे असल्याने अनेक शेतकरी याची लागवड करत होते. मात्र गेल्या काही वर्षात कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ होत असल्यामुळे करडईचा पेरा कमी झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. त्याचा परिणाम आता भाववाढीवर होतो आहे. 

टॅग्स :तेल शुद्धिकरण प्रकल्पकरडईसुर्यफुल