Lokmat Agro >शेतशिवार > उन्हामध्ये शेतात काम केलंय अन् फ्रीजचे गार पाणी पिताय.. आरोग्यासाठी ठरू शकते घातक

उन्हामध्ये शेतात काम केलंय अन् फ्रीजचे गार पाणी पिताय.. आरोग्यासाठी ठरू शकते घातक

Worked in the field in the sun and drinking cold water from the fridge.. can be dangerous for health | उन्हामध्ये शेतात काम केलंय अन् फ्रीजचे गार पाणी पिताय.. आरोग्यासाठी ठरू शकते घातक

उन्हामध्ये शेतात काम केलंय अन् फ्रीजचे गार पाणी पिताय.. आरोग्यासाठी ठरू शकते घातक

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. वाढत्या उन्हामुळे आपल्याला सातत्याने तहान लागते. बाहेरून घरात आल्यानंतर पहिली धाव ही घरातील फ्रीजजवळ जाते. घरात बसून राहावे आणि सतत गारेगार पाणी प्यावे असे प्रत्येकाला वाटते.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. वाढत्या उन्हामुळे आपल्याला सातत्याने तहान लागते. बाहेरून घरात आल्यानंतर पहिली धाव ही घरातील फ्रीजजवळ जाते. घरात बसून राहावे आणि सतत गारेगार पाणी प्यावे असे प्रत्येकाला वाटते.

जोपर्यंत थंड पाण्याचा एक घोट घशामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला आराम मिळत नाही. थंड पाणी पिल्याने तहान भागते; परंतु जास्त थंड पाणी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जास्त थंड पाणी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करू शकते.

उन्हाळ्यात लोकांनी जास्त पाणी प्यावे; परंतु ते पाणी कसे आणि कोणते पित आहोत याबाबतची खबरदारी घ्यावी, असे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनीही उन्हातून काम करून आल्यावर अति थंड पाणी पिणे टाळावे.

पाण्याची कमतरता
उन्हातून फिरून आल्यानंतर थंड पाण्याची गरज भासते; पण थंड पाणी पिण्याची सवय आरोग्याला हानी पोहोचवू शकते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते आणि हायड्रेशनसाठी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र, उन्हाळ्यात फ्रीजमधले थंड पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

श्वसनाचा त्रास होऊ शकतो
थंड पाण्यामुळे शरीराच्या इतर अवयवांचे नुकसान होते. नाकातील श्लेष्मल त्वचा कडक होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो. सर्दी किंवा फ्लूची समस्या असल्यास थंड पाणी पिणे टाळा. थंडीशी संबंधित समस्या उद्भवू शकते.

मायग्रेनची समस्या वाढू शकते
अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते, तसेच मायग्रेनची समस्या वाढू शकते. जर तुम्ही आधीच मायग्रेनचे बळी असाल तर थंड पाण्यामुळे आणखी त्रास जाणवू शकतो.

पचनक्रिया समस्या
उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिल्यामुळे पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते. कारण अन्न खाताना अतिशय थंड पाणी प्यायल्याने अन्न पचण्याऐवजी शरीर त्या ऊर्जेचा वापर पाण्याचे तापमान सामान्य करण्यासाठी करते. त्यामुळे जेवताना थंड पाणी पिऊ नये.

लठ्ठपणा वाढतो
थंड पाणी शरीरात साठलेली चरबी आणखी घट्ट करते. यामुळेच वजन कमी करण्यात अडचण येते. नेहमी थंड पाणी प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो.

उन्हाळा असला तरी नेहमी सामान्य पाणी पिण्याची सवय लावा, तसेच कोमट पाणी पिणे हा पचन, रक्ताभिसरण आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. कोमट पाणी प्यायल्याने तहान कमी लागते. म्हणूनच उन्हाळ्यात सामान्य पाणी पिण्याची सवय लावा. शक्यतो थंड पाणी पिणे टाळा - डॉ. ए. के. कदम

Web Title: Worked in the field in the sun and drinking cold water from the fridge.. can be dangerous for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.