रिसोड येथील कृषी महाविद्यालयात जागतिक एड्स दिवस जनजागृती अभियान शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी पार पडले. यावेळी एड्स निर्मूलन व प्रचार, प्रसार प्रतिबंधात्मक उपाय इत्यादि बाबत जनजागृती करण्यात आली .
कृषी महाविद्यालय रिसोड राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि डॉ.पं.दे.कृ.वी.अकोला सलग्नित सूविदे फाऊंडेशन अंतर्गत आर.एस.डवरे तांत्रीक समन्वयक कृषी महाविद्यालय, रिसोड येथे हा कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण डॉ . ए.एम.अप्तुरकर प्राचार्य व डॉ.पि जी.देव्हडे उपप्राचार्य कृषि महाविद्यालय रिसोड यांच्या हस्ते करण्यात आले कृषी महाविद्यालयाचे कृषी विस्तार शाखेचे प्रा. डी. डी. मसुडकर यांचे नियोजन मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
विद्यार्थी कल्याण विभाग डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शक सूचनेला अनुसरून जागतिक एड्स दिवस निर्मूलन, एड्स HIV ओळख, प्रसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घ्यायची काळजी इत्यादि बाबत प्रश्नमंजुषा , निबंध ,वाचन पोस्टर इत्यादि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्तावीक आर . एस.डवरे वरिष्ठ पीक संरक्षण तज्ञ के वी.के वाशिम तथा विशेष तांत्रीक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड यांनी मांडले . कु. सुचिता फुलउंबरकर प्रथम वर्ष विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त करतांना एड्स निर्मूलन तथा होण्याची कारणे, प्रसार, आणि निर्मूलन बाबत भाष्य केले.डॉ.पि.जी.देव्हडे यांनी सुद्धा जैविक युध्द आणि प्रसार आणि प्रतिबंध यावर विचार व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.ए.एम.अप्तुरकर प्राचार्य कृषि महाविद्यालय रिसोड यांनी भारतीय संस्कृतीचे अवलोकन करुण नीतीचा अवलंब आणि HIV एड्स होण्याची कारणे प्रसार, आणि प्रतिबंध इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करतांना प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असुन भारतीय संस्कृतीचे अवलोकन केले तर एड्स HIV सारख्या कितीही भयंकर रोग असला तरीही प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असुन त्यासाठी मोकळी चर्चा, जनजागृती रॅली समोर येऊन त्याविषयावर भाष्य करुण इत्यादी बाबत संबोधन केले.
ही जनजागृती आणि HIV निर्मूलन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.के.एस.देशमुख प्रा.डी.डी.मसुडकर प्रा.घनेश्र्वरी गोहाडे सागर राठोर तथा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक वृषभ चौधरी यशवंत सावके हर्षल काळबांडे रोहन झाडे तथा संपूर्ण कर्मचारीवृंद विद्यार्थि वर्ग कृषि महाविद्यालय रिसोड यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिपक मसुडकर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.कु.घनेश्र्वरी गोहाडे कृषि विस्तार शिक्षण विभाग यांनी करुण कार्यक्रमाची सांगता केली.