Lokmat Agro >शेतशिवार > World Cotton Day 2024 : अत्याधुनिक टेक्नीकने कापसाची विविधांगी वीण

World Cotton Day 2024 : अत्याधुनिक टेक्नीकने कापसाची विविधांगी वीण

World Cotton Day 2024 : Today's world cotton day | World Cotton Day 2024 : अत्याधुनिक टेक्नीकने कापसाची विविधांगी वीण

World Cotton Day 2024 : अत्याधुनिक टेक्नीकने कापसाची विविधांगी वीण

आज जागतिक कापूस दिवस आज साजरा केला जातो. त्याविषयी वाचा सविस्तर (World Cotton Day 2024)

आज जागतिक कापूस दिवस आज साजरा केला जातो. त्याविषयी वाचा सविस्तर (World Cotton Day 2024)

शेअर :

Join us
Join usNext

World Cotton Day 2024 : कापूस पीकाने आजच्या घडीला जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. कापूस उत्पादकाच्या लाखोंच्या मिळकतीपाठोपाठ कंपन्यांची कोट्यावधीची उलाढाल आणि स्थानिक कामगारांची दिवसांची हजार रुपयांतील रोजंदारीला चालना मिळाली आहे.

कापसाच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत कोट्यावधी रुपयांची उळलाढाला होते. याच कापसाने अनेक रोजगारांपाठोपाठ विविध आर्थिक स्त्रोत निर्माण करून नवीन वीण जपली आहे. आज (७ ऑक्टोबर) 'जागतिक कापूस दिवस'. यंदाच्या वर्षी ''पर्यावरणपुरक वस्त्र निर्मिती'' अशी थीम घेण्यात आली आहे.

जागतिक स्तरावर सर्वात जास्त वापरले उत्पादन म्हणजे कापूस होय. कापसात विशेषत: कापूस फायबर आणि कापूस बियाणे यांची निर्मिती केली जाते. कापुस हे विविध गुणधर्माचे पीक आहे.  याचा उपयोग कापड उद्योगात मोठ्या प्रमाणात केला जातो.

त्याच बरोबरच वैद्यकीय क्षेत्र, खाद्यतेल उद्योग, पशुखाद्य आणि बुक बाइंडिंगमध्ये देखील हे पीक उपयुक्त ठरत आहे. जगात सर्वात मोठा कापूस उत्पादक देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा होतो. दरवर्षी ७ ऑक्टोबरला 'जागतिक कापुस दिवस' साजरा केला जातो. पहिला जागतिक कापूस दिवस जागतिक व्यापार संघटनेने (WTO) ७ ऑक्टोबर २०१९ रोजी साजरा केला होता. आफ्रिकन कापूस उत्पादक देश, बेनिन, बुर्किना फासो, चाड आणि माली, यांना एकत्रित घेऊन कॉटन-४ (WTO) म्हणून ओळखले जाऊ लागले.

WTO ने केले स्वागत  

जागतिक कापूस दिनाचे आयोजन करणाऱ्या कापूस-४ देशांच्या पुढाकाराचे WTO ने ७ ऑक्टोबर २०१९ रोजी या दिवसाचे स्वागत केले होते. यावेळी व्यापार आणि विकास, आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी विषयक संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सचिवालयांसह संघटना  आणि WTO ने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. WTO मुख्यालयात, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख, जिनिव्हा-आधारित प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय सदस्य कार्यक्रमात उपस्थित होते.

कापूस समुदाय, जसे की राष्ट्रीय उत्पादक संघटना, तपासणी सेवा प्रदाते, व्यापारी, विकास सहाय्यातील भागीदार, शास्त्रज्ञ, किरकोळ विक्रेते, ब्रँड प्रतिनिधी आणि खाजगी क्षेत्र, कापूस संबंधित क्रियाकलाप आणि वस्तूंचे प्रात्यक्षिक आणि कौशल्य सामायिक करण्याची संधी सहभागींसाठी महत्त्वपूर्ण होती.  
 
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने प्रदान केलेल्या पोस्टर्सवर आधारित, २०२२ मध्ये जागतिक कापूस दिवस साजरा करण्याची थीम 'कापूससाठी चांगले भविष्य आणणे' (FAO) ही आहे. थीमचा विचार करतांना कापूस मजूर, अल्पभूधारक आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन चांगले करण्यासाठी शाश्वत असलेल्या कापूस लागवडी आधारित होता.

जागतिक कापूस दिनाचे महत्त्व

जागतिक कापूस दिनाने गेल्या दोन वर्षांत ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची आणि कापूसशी संबंधित कृतींवर प्रकाश टाकण्याची संधी दिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या जागतिक कापूस दिनाला औपचारिक मान्यता दिल्याने, कापूस आणि कापूसशी संबंधित उत्पादनांबद्दल जागरूकता वाढवण्याची तसेच विकसनशील राष्ट्रांना त्यांच्या कापूसशी संबंधित विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अधिकाधिक प्रवेश मिळण्याची गरज आहे. वस्तू हे नैतिक व्यापार पद्धतींना प्रोत्साहन देते आणि विकसनशील राष्ट्रांना कापूस मूल्य साखळीच्या प्रत्येक टप्प्यातून नफा मिळवणे शक्य करते.

जागतिक कापूस दिवस दरवर्षी कापूस उत्पादक, प्रक्रिया करणारे, संशोधक आणि इतर सर्व भागधारकांना कापूस उत्पादन आणि विक्री संदर्भातील माहिती आणि मदत करणार्‍या उपक्रमांचे आयोजन करुन साजरा केला जातो.

या कार्यक्रमामुळे शेतकरी आणि उदयोन्मुख देशांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने चालना मिळते. ७ ऑक्टोबर हा  दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस कापूस उत्पादक आणि कंपन्यासाठी महत्वपूर्ण दिवस आहे.  

महाराष्ट्रात विदर्भा, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. विदर्भातील खामगाव तालुक्यात कापसाची जिन म्हणून ओळखले जाते.कापूस उत्पादकांपाठोपाठ मजूरही कापूस वेचणीच्या माध्यमातून मोठी कमाई करतात.

कापसाची दुहेरी भुमिका

निर्सगाचा संरक्षक मानला जाणारा कापूस समाजातील मानवाची प्रतिष्ठा जपणारा ठरतो. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या विशेष दिवसानिमित्त कापसाविषयीची संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी कापूस उत्पादनाशी संबंधित माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविली जाते. लोकांना कापसाचे महत्त्व आणि त्याचे गुणधर्म याबद्दल माहिती दिली जाते.

कापसातून अशी होती निर्मिती

पशुखाद्य आणि खत निर्मिती ४६ टक्के
खाद्य तेल आणि उत्पादन १६ टक्के
फर्निचर आणि इतर उत्पादने ८ टक्के
पॅकेजिंग आणि इंधन  २७ टक्के
वस्त्रोद्याग क्षेत्रात ३५ टक्के

जगभरातील प्रमुख उत्पादक; भारताचा झेंडा उंच

जगभरात कापसाचे उत्पादन घेणारे मोजकेच देश आहे. या ठिकाणी अत्याधुनिक तंत्राचा वापर करून कापूस पीक घेतले जाते. त्यात भारतात सर्वाधिक उत्पादन होते. याठिकाणी आजही पारंपरिक आणि अत्याधुनिक अशा दोन्ही पध्दतीने कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

त्यापाठोपाठ चीन, अमेरिका, ब्राझील, पाकिस्तान, तुर्की या देशात कमी अधिक प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते तर सर्वात कमी उत्पादन घेतले. तसेच गेल्या काही वर्षांपासून उझबेकीस्तान येथे ही कापूस लागवडीवर भर देण्यात आला. यातून या ठिकाणीही कापूस पीक घेतले जाते.

Web Title: World Cotton Day 2024 : Today's world cotton day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.