Lokmat Agro >शेतशिवार > World Nature Conservation Day 2024 : निसर्ग आपला मित्र

World Nature Conservation Day 2024 : निसर्ग आपला मित्र

World Nature Conservation Day 2024 :  | World Nature Conservation Day 2024 : निसर्ग आपला मित्र

World Nature Conservation Day 2024 : निसर्ग आपला मित्र

World Nature Conservation Day 2024 : ''जागतिक निसर्ग संवर्धन दिन'' जाणून घेऊया  निसर्गाचे महत्व

World Nature Conservation Day 2024 : ''जागतिक निसर्ग संवर्धन दिन'' जाणून घेऊया  निसर्गाचे महत्व

शेअर :

Join us
Join usNext

 आज जगभरात ''जागतिक निसर्ग संवर्धन दिन'' (World Nature Conservation Day) मोठया प्रमाणात साजरा केला जात आहे. हा दिवस निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. जगभरात विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित केले जातात.
या दिवशी नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे,  तसेच निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. 

दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिन २८ जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व सर्व सामान्यांना पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी नैसर्गिक संसाधनाचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षणावर आपण काय करू शकतो. यादृष्टीने मार्गदर्शन केले जाते.  निसर्ग आपल्याला आईसारखा आहे. त्याचे जतन करणे आणि संर्वधन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत. जागतिक तापमान वाढ, वाढते प्रदूषण आणि इतर कारणामुळे नैसर्गिक समतोल बिघडत आहे. त्यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. यामुळे पृथ्वीवर होणाऱ्या दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल.

निसर्ग संवर्धन म्हणजे काय?

निसर्गातील सर्व संसाधनांचा मुबलक प्रमाणात वापर करणे आणि शाश्वत, पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करणे होय. निसर्ग संसाधने म्हणजेच हवा, पाणी, खनिजे आणि माती यांचा काटेकोर पध्दतीने अवलंब करणे. जेणेकरून आपण आपल्याकडील वारसा हा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे.  याच उद्देशाने ''जागतिक निसर्ग संवर्धन दिन'' साजरा केला जातो. 

निसर्ग आणि शेती 

शेतीही निसर्गावर आधारित आहे. परंतू गेल्या काही वर्षात ज्या पध्दतीने शेती केली जाते.  जमिनीत अर्माद स्वरूपात रासायनिक खतांचा वापर वाढता आहे. त्यामुळे जमिनीचा -हास होताना दिसतो. त्यामुळे आता वेळी अली आहे की एकत्र येऊन नैसर्गिक शेतीकडे वाळून शेणखत आणि इतर नैसर्गिक खतांचा वापर करून चांगले उत्पादन घेऊन निसर्गाशी मैत्री करावी.

यंदा काय आहे संकल्पना

या वर्षीची संकल्पना जरा वेगळी आहे. या वर्षी “लोक आणि वनस्पती जोडणे, वाइल्डलाइफ संवर्धनात डिजिटल इनोव्हेशन एक्सप्लोअर करणे.”  या संकल्पनेत काम केले जाणार आहे.  सगळयांनी एकत्रीत येऊन पर्यावरणाशी नाते जोडणे आणि लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे, हा उद्देश आहे. 


 

Web Title: World Nature Conservation Day 2024 : 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.