Join us

जागतिक चिमणी दिवस विशेष; चला चिऊताईला वाचवूया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:45 AM

शेतीमध्ये चिमणी हा पक्षी पिकाचे किडींपासून होणारे नुकसान यात किडींच्या आळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो. तसेच पिक काढणीला आल्यावर चिमण्या दाणे खातात यात शेतकरी स्वखुशीने तेवढे धान्य त्यांना सोडून देतो. चिमणी जगेल तरच आम्ही जगू असे त्याची भूमिका असते. 

काही वर्षापूर्वी शाळेत असताना भिंतींना टांगलेला खोपा, त्यात बागडणारी चिऊताई आज कुठेतरी हरवलीय. अंगणात दाणे टिपणाऱ्या चिऊताईचे आज दिवसेंदिवस दर्शन दुर्मीळ होत चालले आहे. आपल्या शाळेच्या पुस्तकातील चिऊताई कुठे हरवली, याचा विचार आज प्रत्येकाने करण्याची गरज आहे.

मानवाच्या सर्वांत जवळची प्रजाती म्हणून श्वानाव्यतिरिक्त चिमणीची गणना केली जाते. अंटार्टिक वगळता जिथे जिथे मानवी अस्तित्व आहे, तिथे चिमणीचे वास्तव्य आहे. अगदी ११,००० वर्षांपूर्वीपासून हा चिमुकला जीव माणसांच्या सोबत असल्याचे पुरावे संशोधनातून पुढे आले आहेत. म्हणजे माणूस समूहाने शेती करायला लागला, तेव्हापासून चिऊताईची त्याला सोबत आहे, असे संशोधकांचे मत आहे

आजच्या आधुनिकतेच्या जमान्यात मानवाने आपल्या स्वार्थापोटी झाडे तोडून सिमेंटची जंगले उभारली आणि चिमणीच्या हक्काचे घरच हिरावले. झाडाला टांगलेला खोपा आता दुर्मीळ होत चालला आहे. शेतीमध्ये ही जैवविविधता राखण्यासाठी चिमणी महत्वाची भूमिका बजावते.

शेतीमध्ये चिमणी हा पक्षी पिकाचे किडींपासून होणारे नुकसान यात किडींच्या आळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो. तसेच पिक काढणीला आल्यावर चिमण्या दाणे खातात यात शेतकरी स्वखुशीने तेवढे धान्य त्यांना सोडून देतो. चिमणी जगेल तरच आम्ही जगू असे त्याची भूमिका असते. 

वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आधुनिक प्रकारच्या घरबांधणीमुळे घरट्यांची तसेच अन्नाची अनुपलब्धता, शहरातील वाढते प्रदूषण, यासारख्या अनेक कारणांमुळेही चिमण्यांची संख्या घटत आहे.

चिमणी (हाउस स्पॅरो) आणि रान चिमणी (यलो थ्रोटेड चिमणी) अशा दोन प्रकारच्या चिमण्या जगभरात आढळतात. चिमणी हा पक्षी हिमालयाच्या २००० मीटर उंचीपर्यंत, तसेच भारतातही सगळीकडे आढळतो. नदीपात्रातील प्लॅस्टिक कचऱ्यामुळे चिमण्यांना अन्न शोधण्यासाठी अडचणी येत आहेत. पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे.

का घटतेय संख्या?• टेलिकॉम टॉवरच्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो, असे संशोधन आहे.• जुन्या इमारती, वाडे, घरे नाहीशी झाली.• काही दशकांत अन्नासाठी चिमणीसोबत भोवरी,• मैना, पारवा या पक्ष्यांची स्पर्धा वाढली असून ते प्रबळ ठरत आहेत.• मोठी शहरे सोडून चिमण्यांनी मुक्काम लहान शहर किंवा गावांकडे वळविला आहे.

संवर्धनासाठी काय कराल?• पक्षी संवर्धन आणि निसर्ग संवर्धन• चिमणी वाचवण्यासाठी जनजागृती• अन्नसाखळीचे संवर्धन करणे• घराभोवती झाडे लावणे• घराभोवती पाणी ठेवणे• घरटे बांधण्यासाठी वातावरणनिर्मिती

उसाच्या एक पीकपद्धतीमुळे ज्वारी, वरी, बाजरी, कुटकी, गहू यांसारखी पिके कमी होत आहेत. त्यामुळे चिमण्यांना अन्न मिळत नाही. पेरू, जांभूळ, अळू, तोरणे, धामणी, आसुळी, चिकुणी, निळंबी, म्हेके, नेर्ली, करवंदे, बोर, चिंचा यांशिवाय चिवे, बांबू, बाभूळ, धावडा, यांसारखी जंगली फळांची झाडे चिमण्यांच्या अन्नाचा स्रोत आहे. तो वाढविला पाहिजे.

बदलत्या जीवनशैलीचा पक्षांवर परिणाम गेल्या काही वर्षामध्ये चिमण्यांचे मोठ्या प्रमाणात स्थानांतर झाले आहे. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा त्यांच्यावर परिणाम होत आहे. वाहतुकीपासून लांब राहणे त्या पसंत करतात.

चिमण्यांचा अधिवास आपण टिकवू शकलो नाही. मोकळ्या जागा कमी झाल्या. कृत्रिम घरट्यांमुळे त्यांना जागा मिळाली; परंतु त्यांचे अन्न कमी पडत आहे. रस्त्यावर वाढलेल्या वाहतुकीमुळे चिमण्या आपल्यापासून दूर जात आहेत. 

टॅग्स :शेतीशेतकरीपर्यावरणपाणी