Join us

अबब किती हे फायदे; ताकाचे आरोग्यदायी फायदे वाचल्यावर तुम्ही देखील हेच म्हणाल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 00:00 IST

Healthy Buttermilk : ताक ज्याचे भारतीय आहार शास्त्रात अमृताच्या रूपात वर्णन केलं जाते असे हे ताक शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचं आणि उपयुक्त शितपेय आहे.

ताक ज्याचे भारतीय आहार शास्त्रात अमृताच्या रूपात वर्णन केलं जाते असे हे ताक शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचं आणि उपयुक्त शितपेय आहे. ताकाच्या नियमित सेवनाने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते, शरीरातील घातक पदार्थ बाहेर पडतात, आणि इतर अनेक फायदे मिळतात.

ताकामध्ये विटामिन बी१२, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस यासारखी महत्त्वाची पोषणतत्त्वं असतात जी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. जर तुमचे पोट साफ होत नसेल, तर ताक पिण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. 

ताक पिण्याचे १० महत्वाचे फायदे

वजन कमी होण्यास मदत : ताकाच्या नियमित सेवनाने शरीराची चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

लघवीचा त्रास कमी : ताकात थोडं मीठ घालून प्यायल्याने वारंवार लघवीचा त्रास कमी होतो.

तोंड येणं होईल कमी : ताकाने गुळण्या केल्याने तोंड येणे बऱं होतं.

पोटातील जंतू होतात नष्ट : ताकात ओवा टाकून प्यायल्याने पोटातील जंतू मरून जातात.

लघवी करताना जळजळ होते कमी : ताकात गुळ टाकून प्यायल्याने लघवी करताना होणारी जळजळ कमी होते.

डोकेदुखी कमी होण्यास मदत: थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

पोटदुखी कमी होते : रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी कमी होते.

पित्ताचा त्रास होतो कमी : ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

लहान मुलांसाठी अधिक फायद्याचे : दात येत असताना मुलांना ताक द्यायचं असल्यास, दिवसभरात २-३ वेळा ४ चमचे ताक दिल्यास त्यांना दात येताना होणारा त्रास कमी होतो.

चेहऱ्यावरील काळे डाग, मृतत्व होतात कमी : तीन दिवस ताक पिऊन केल्यास शरीराचे नैतिक पंचकर्म होतं, ज्यामुळे शरीरातील घातक पदार्थ बाहेर पडतात आणि चेहऱ्यावरील काळे डाग, मृतत्व कमी होतात.

ताकाचे मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र तरीही अतिप्रमाणात सेवन करण्याआधी आपल्या वैद्यकीय सल्लागारांशी चर्चा करणे कधीही योग्य आहे. 

हेही वाचा : उन्हाळ्यात फायद्याची गुणकारी काकडी; वाचा काकडीचे आरोग्यदायी फायदे

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नभाज्यादूधसमर स्पेशलशेती क्षेत्रशेतकरी