Lokmat Agro >शेतशिवार > सन २०२२-२३ भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर; पहा आपलं गाव आहे का?

सन २०२२-२३ भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर; पहा आपलं गाव आहे का?

Year 2022-23 District level results of bhujal samruddha gram competition announced; Do you see your village? | सन २०२२-२३ भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर; पहा आपलं गाव आहे का?

सन २०२२-२३ भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर; पहा आपलं गाव आहे का?

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२३ चे ग्रामपंचायत निहाय जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल ...

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२३ चे ग्रामपंचायत निहाय जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल ...

शेअर :

Join us
Join usNext

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२३ चे ग्रामपंचायत निहाय जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अटल भूजल योजनेचे सहसंचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी कळविले आहे.

लोकसहभागाद्वारे भूजलाचे संनियंत्रण करणे, जलसुरक्षा आराखडा तयार करणे व त्यामध्ये समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणे, राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण होणे, यासाठी ग्रामस्तरावर सुदृढ वातावरण निर्मितीसाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबवण्यासाठी मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजना २६ नोव्हेंबर, २०२० पासून महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील ४३ तालुक्यामधील ११३३ ग्रामपंचायतींमध्ये सुरु आहे. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा आहे. त्याकरीता ग्रामस्तरावर जलअंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरुन काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे व ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

अधिक वाचा: मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे काढण्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज?

अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्याकरीता मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी गावा-गावांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होण्याच्या दृष्टीने व अटल भूजल योजनेचे मुख्य उद्दिष्ट “लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन” साध्य होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन २०२२-२३ व २०२३२-२४ या दोन आर्थिक वर्षांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेमधील ठळक बाबी पुढीलप्रमाणे
-
सन २०२३ मध्ये महाराष्ट्रातील योजनेत समाविष्ट पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशीव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या १२ जिल्ह्यातील २७० ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
एकूण ५५० गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आली.
- स्पर्धेचे मूल्यांकन उपविभागस्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीनस्तरावर करण्यात आले.
उपविभागीय समिती: उपविभागीय अधिकारी (महसूल) अध्यक्ष व इतर सदस्य.
जिल्हास्तरीय समिती: जिल्हाधिकारी अध्यक्ष व इतर सदस्य.
राज्यस्तरीय समिती: प्रधान सचिव, पाणीपुरवठा  व स्वच्छता विभाग अध्यक्ष व इतर सदस्य.

अधिक वाचा: एक एकर जमीन असणाऱ्यांनाही मिळणार रोजगार हमीतून विहिरीचा लाभ

पुरस्काराचे स्वरुप
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार हा १ कोटी रुपयांचा राज्यस्तरीय द्वितीय पुरस्काराची रक्कम ५० लाख असून तृतीय पुरस्कार ३० लाख रुपयांचा आहे. तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ५० लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ३० लाख व तृतीय क्रमांकास २० लाखांचे पारितोषिक आहे. ग्रामपंचायतींना राज्य व जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम अटल भूजल योजनेंतर्गत राज्यास प्राप्त होणाऱ्या प्रोत्साहन निधीमधून अदा केली जाणार आहे.

सन २०२२-२३ साठी घेण्यात आलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल पुढीलप्रमाणे
जिल्हास्तरावरील प्रथमद्वितीय  तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची यादी

Web Title: Year 2022-23 District level results of bhujal samruddha gram competition announced; Do you see your village?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.