Join us

ई पिक पाहणी कराल तरच पिक विम्याचा लाभ मिळेल

By बिभिषण बागल | Published: August 14, 2023 8:00 AM

यावर्षी १ रुपयात पीकविमा असल्याकारणे मोठ्या प्रमाणात विमा भरला गेला आहे पण त्याचबरोबर तुम्ही ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे तुम्ही पीकविमा भरताना जे पिक नोंदविले आहे तेच पिक ई पिक पाहणीत नोंदविले असायला हवे तरच तुम्हाला पिक विम्याचा लाभ घेता येईल. यासाठी ई पिक पाहणी करणे जरुरीचे आहे.

आपल्या शेतात आपण कोणती पिके घेतली आहेत ती हंगाम निहाय वेगळी आहेत, सद्यस्थितीत बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तर काही ठिकाणी कसलाच पाऊस नाही अशावेळी हंगाम असाच जातो कि काय याची चिंता शेतकऱ्याला वाटते आहे अशावेळी विम्याचं कवच करून घेणे गरजेचे आहे आणि यावर्षी १ रुपयात पीकविमा असल्याकारणे मोठ्या प्रमाणात विमा भरला गेला आहे पण त्याचबरोबर तुम्ही ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे तुम्ही पीकविमा भरताना जे पिक नोंदविले आहे तेच पिक ई पिक पाहणीत नोंदविले असायला हवे तरच तुम्हाला पिक विम्याचा लाभ घेता येईल. यासाठी ई पिक पाहणी करणे जरुरीचे आहे.

ई-पीक पाहणीचे फायदे

१) शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अंत्यत उपयुक्त ठरणार आहे.२) राज्यभरामध्ये एकाच प्रकारच्या पीकासाठी एकच सांकेतांक क्रं. निश्चित करण्यात येत असलेने, गाव/तालुका/जिल्हा/विभाग निहाय कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे. याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे.३) कृषी विभागाच्या विशिष्ट पिकासाठी देय असणाऱ्या योजना जसे ठिबक/तुषार सिंचन योजना इत्यादी चे लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे सहज शक्य होणार आहे.४) आधार भूत किंमतीवर धान/कापूस/हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी देखील पीक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे.५) खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होवू शकते. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांकडून किती रोजगार हमी योजना उपकर व किती शिक्षण कर देय ठरत आहे, हे निश्चित करता येते.६) खातेदार निहाय पीक पाहणी मुळे खातेदार निहाय पीक कर्ज अथवा पीक विमा योजना भरणे किंवा पीक नुकसान भरपाई अदा करणे शक्य होणार आहे.७) कृषी गणना अंत्यत सुलभ पध्दतीने व अचूकरित्या पुर्ण करता येईल.

शेतकरी नोंदणी प्रक्रिया

१) नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोर/वेब लिंक वरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (install) करावा.२) खातेदाराने ई पीक पाहणी अॅप मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी.३) ७/१२ मधील नावाप्रमाणे खातेदाराने त्यांच्या नावाची अचूक पणे नोंदणी करावी.४) खातेदार त्यांचे नाव किंवा खाते क्रमांक शोधून नोंदणी करू शकतील.५) ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एका पेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत,त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास,त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन/गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील.६) वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस (SMS) द्वारे चार अंकी संकेतांक (पासवर्ड) प्राप्त होईल.७) सदरहू प्राप्त झालेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) चौकटीत अचूकपणे नोंदविल्यास खातेदाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.८) यशस्वी नोंदणी प्रक्रियेनंतर नोंदणीकृत मोबाईलवर खातेदाराचे नाव निवडून चार अंकी संकेतांक (पासवर्ड) चौकटीत टाकून लॉगिन केल्यास पिक पाहणीची माहिती भरता येईल.

मार्गदर्शक सूचना

१) शेतकऱ्यांच्या नोंदणीकरिता त्यांचा खाते क्रमांक/भूमापन/गट क्रमांकाच्या माहितीसाठी संगणकीकृत ७/१२ किंवा ८अ ची अद्ययावत प्रत सोबत असल्यास योग्य राहील.२) सामायिक मालकीच्या जमिनीसाठी, ज्याचे नाव गाव न.नं. ७/१२ मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे, ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.३) अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक (अज्ञान पालक कर्ता) नोंदणी करू शकतील.४) खातेदाराने पीक पाहणी ची माहिती शेतामध्ये उभे राहून करायची असून पीक पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो (GPS enabled) व सर्व माहिती अपलोड करायची आहे. जर मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल त्या ठिकाणी जावून पीक पाहणीची माहिती अपलोड करता येईल.५) नोंदणीकृत मोबाईलवर आलेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) कायमस्वरूपी वैध राहून वापरता येईल.६) एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल, तर सहजरीत्या उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन नोंदणीसाठी वापरू शकतात.७) एका मोबाईल नंबरवरून एकूण २० खातेदारांची नोंदणी करता येईल.

वेबसाईट: https://mahabhumi.gov.inईमेल: epp.mahabhumi@gmail.com 

टॅग्स :शेतीशेतकरीपीकपीक विमासरकार