Lokmat Agro >शेतशिवार > Zendu farming : दिवाळीला बाजारात झेंडूची मागणीत वाढ; मिळतोय चांगला दर

Zendu farming : दिवाळीला बाजारात झेंडूची मागणीत वाढ; मिळतोय चांगला दर

Zendu farming: Increase in demand for marigolds in Diwali market | Zendu farming : दिवाळीला बाजारात झेंडूची मागणीत वाढ; मिळतोय चांगला दर

Zendu farming : दिवाळीला बाजारात झेंडूची मागणीत वाढ; मिळतोय चांगला दर

शेतकऱ्यांनी यंदा बऱ्यापैकी झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे. सध्या ही झेंडूची फुले चांगलीच बहरलेली आहे.(Zendu farming)

शेतकऱ्यांनी यंदा बऱ्यापैकी झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे. सध्या ही झेंडूची फुले चांगलीच बहरलेली आहे.(Zendu farming)

शेअर :

Join us
Join usNext

Zendu farming :

वडोद तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा धावडा, वालसावंगीसह परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा बऱ्यापैकी झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे.  सध्या ही झेंडूची फुले चांगलीच बहरलेली आहे.

दिवाळी सणाच्या एक-दोन दिवस अगोदर तोडून बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याचे उत्पादक शेतकरी विजय दौलत तांगडे यांनी सांगितले आहे.

परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलशेतीला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे या फुलांना चांगला भाव मिळेल, अशी उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा लागली आहे.

नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सणांचे औचित्य साधून वडोद तांगडा, धावडा व वालसावंगीसह परिसरातील शेतकऱ्यांनी दोन पैसे अधिक मिळेल, या आशेपोटी जून-जुलै महिन्यात झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे. आता दिवाळीनिमित्त फुलांना मोठी मागणी आहे; परंतु, शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची भीती वाटत आहे.

दसरा सणाला चांगला दर मिळाला

एके काळी भाव नसल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी फुले फेकून दिली होती. फुले तोडणीचाही खर्च निघत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते; परंतु आता दिवाळी सणानिमित्त फुलांना चांगली मागणी आहे. दसरा सणालाही चांगला दर मिळाला होता.  - विजय तांगडे, उत्पादक शेतकरी

असे आहेत दर

फुलाचा प्रकारसध्या मिळत असलेले भाव
गलांडा ५० ते १०० रुपये
गुलाब१०० ते १२० रुपये
काकडा२०० ते ३०० रुपये
निशिगंध१०० ते १५० रुपये
शेवंती १५० ते १८० रुपये
झेंडू  ८० ते १०० रुपये

Web Title: Zendu farming: Increase in demand for marigolds in Diwali market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.