Join us

१ लाख ७१ हजार शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 10:02 AM

कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची लेखापरीक्षकांकडून शासकीय तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये जाहीर झालेल्या कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असताना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची लेखापरीक्षकांकडून शासकीय तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ अनुदान मंजूर देखील करण्यात आले आहे. 

गेल्या जानेवारीत राज्यातील कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागला. कांद्याला दर नसतानाही शेतकऱ्यांनी बाजार समिती आणि खासगी बाजार समितीत अत्यल्प दराने कांदा विकला होता. या प्रकरणाची दखल घेत शासनाने 'ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०१३ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समितीमध्ये मातीमोल भावाने कांदा विकावा लागला. कांद्याला दर नसतानाही शेतकऱ्यांनी बाजार समिती आणि खासगी बाजार समितीत अत्यल्प दराने कांदा विकला होता. या प्रकरणाची दखल घेत शासनाने 'ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०१३ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समितीमध्ये मातीमोल भावाने कांदा विकावा लागला.

कांद्याला दर नसतानाही शेतकऱ्यांनी बाजार समिती आणि खासगी बाजार समितीत अत्यल्प दराने कांदा विकला होता. या प्रकरणाची दखल घेत शासनाने 'ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०१३ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समितीमध्ये मातीमोल भावाने कांदा विकावा लागला. कांद्याला दर नसतानाही शेतकऱ्यांनी बाजार समिती आणि खासगी बाजार समितीत अत्यल्प दराने कांदा विकला होता. या प्रकरणाची दखल घेत शासनाने 'ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०१३ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समितीमध्ये पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आयसीआयसीआय बँकेच्या पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे.

कांदा अनुदानासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कार्यालयात जिल्ह्यातील सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच बाजार समित्यांचे सचिव व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कामकाज करीत होते. - फयाज मुलाणी, जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनाशिक