Join us

राज्यात १ हजार २८९ क्विंटल ज्वारीची आवक, पुण्यासह धाराशिवमध्ये क्विंटलमागे मिळतोय..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 2:56 PM

पुण्यात मालदांडी ज्वारीला सर्वाधिक, धाराशिव, लातूरमध्ये ज्वारीला कसा मिळतोय भाव?

सकाळच्या सत्रात पुण्यात मालदांडी ज्वारीची चमक वाढली असून शाळू, दादर, लोकल, हायब्रीड ज्वारीच्या तुलनेत क्विंटलमागे अधिक दर मिळत आहे. आज सकाळच्या सत्रात पुण्यात सर्वाधिक ज्वारीची आवक झाली. यावेळी ६९३ क्विंटल ज्वारी बाजारात विक्रीकरीता आली होती. शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत असून कमीत कमी ४४०० तर जास्तीत जास्त ५६०० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज सकाळच्या सत्रात राज्यात १२८९ क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी धुळ्यात हायब्रीड आणि दादर ज्वारीची आवक झाली होती. तर बुलढाण्यात बाजारसमितीत शाळू ज्वारीची आवक झाली. यावेळी शाळू ज्वारीला सर्वसाधारण २५००ते ३३०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

दरम्यान, काल १४ हजार ३०० क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. यावेळी सर्वाधिक भाव पुण्यात मालदांडी ज्वारीलाच मिळाला असून धाराशिवमध्ये पांढऱ्या ज्वारीलाही चांगला भाव मिळाला. आज कोणत्या बाजारसमितीत काय भाव सुरु आहे? जाणून घ्या..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/05/2024
अकोलालोकल40187021902060
अमरावतीलोकल15180021001950
बुलढाणाशाळू35220033002500
छत्रपती संभाजीनगररब्बी14190021452000
छत्रपती संभाजीनगरशाळू85200023702185
धाराशिवपांढरी75250032553000
धुळेहायब्रीड91182521652118
धुळेदादर35228529512511
जालना---15201022002150
लातूरहायब्रीड32195021502050
लातूरपिवळी6290029002900
नागपूरलोकल3340036003550
पुणेमालदांडी693440056005000
सातारामालदांडी150360038003700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)1289

टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्ड