Lokmat Agro >बाजारहाट > Mango Festival कोल्हापुरातील आंबा महोत्सवात ४७ जातींचे चवदार आंबे

Mango Festival कोल्हापुरातील आंबा महोत्सवात ४७ जातींचे चवदार आंबे

47 varieties of delicious mangoes at the Mango Festival in Kolhapur | Mango Festival कोल्हापुरातील आंबा महोत्सवात ४७ जातींचे चवदार आंबे

Mango Festival कोल्हापुरातील आंबा महोत्सवात ४७ जातींचे चवदार आंबे

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे राजारामपुरीतील भारत हौसिंग सोसायटी हॉलमध्ये आयोजित आंबा महोत्सवात ४७ प्रकारचे आंबे ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. रविवारी महोत्सवाला सुरुवात झाली.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे राजारामपुरीतील भारत हौसिंग सोसायटी हॉलमध्ये आयोजित आंबा महोत्सवात ४७ प्रकारचे आंबे ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. रविवारी महोत्सवाला सुरुवात झाली.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे राजारामपुरीतील भारत हौसिंग सोसायटी हॉलमध्ये आयोजित आंबा महोत्सवात ४७ प्रकारचे आंबे ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. रविवारी महोत्सवाला सुरुवात झाली. गुरुवारी अखेर दिवस आहे.

महोत्सव उत्पादक ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था आहे. महोत्सवाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ असणार आहे. उत्पादक शेतकरी भारत सलगर, विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवचे उद्घाटन झाले.

अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक सचिन कांबळे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, बबनराव रानगे आदी उपस्थित होते.

आंबा महोत्सवात कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड या जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी ३२ स्टॉल मांडले आहेत. महोत्सवात आंब्याचा दर प्रति डझन ३०० ते ७०० रुपये असा आहे.

याठिकाणी हापूस, करूठा, कोलंबन, बैगनपल्ली, पायरी पंचदराकलशा, हिमायुददीन, राजुमन, वातगंगा, रत्ना, कोकण रुची, करुकम, काळा करेल, चेरूका रासम, विलाय कोलंबन, रानू कल्लू, जहांगीर, नाजूक पसंद, कोंडूर गोवा, तोतापुरी, छोटा जहांगीर, केसर, माया, कुलास, याकृती, कोरन, पदेरी, बनेशान, वनराज, पेढरबाम, दूधपेढा, बंगाली पायरी, निलम, मोहनभोग या जातींचे आंबे प्रदर्शनात आहेत.

आंबा महोत्सवाला कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत कोल्हापूकरांनी तब्बल ४ हजार डझन आंबे फस्त केले असून १४ लाखांची उलाढाल झाली आहे. 'देवगड' हापूसला सर्वाधिक पसंती राहिली आहे.

पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते, यंदा लोकसभा निवडणुकीमुळे महोत्सवाला थोडा उशीर झाल्याने प्रतिसाद कसा मिळतो? याबाबत साशंकता होती. मात्र, महोत्सवातील आंब्यांचे प्रकार व खात्रीमुळे कोल्हापूरकरांच्या आंबा खरेदीसाठी अक्षरशः उड्या पडत आहेत.

२८ शेतकरी सहभागी
या महोत्सवात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूरसह कोल्हापुरातील २८ शेतकरी सहभागी झाले आहेत. 'रत्नागिरी हापूस'सह विविध वाणांचे आंबे उपलब्ध असले तरी तुलनेत देवगड हापूसला मागणी अधिक आहे. आतापर्यंत ५०० डझन देवगड आंब्याची विक्री झाली आहे.

राजारामपुरीत आंब्याचा सुगंध
राजारामपुरी येथील भारत हाउसिंग सोसायटी हॉलमध्ये महोत्सव सुरू असून अस्सल कोकणी आंब्याचा सुगंध परिसरात दरवळत आहे. त्यामुळे गेले दोन दिवस रात्री उशिरापर्यंत गर्दी पहावयास मिळत असून १७ हजार ग्राहकांनी भेट दिली आहे.

आंबा महोत्सवात खात्रीशीर व इतरांच्या तुलनेत कमी दरात आंबा मिळत असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. गुरुवार (दि. २३) पर्यंत महोत्सव सुरू राहणार असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा. - डॉ. सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ, कोल्हापूर

अधिक वाचा: Jamun Market लहरी हवामानाचा फटका; जांभळाला आला हापूसचा भाव

Web Title: 47 varieties of delicious mangoes at the Mango Festival in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.