Join us

राज्यात ९ हजार १७ क्विंटल सोयाबीनची आवक, हिंगोली, वाशिमसह उर्वरित बाजारपेठेत मिळतोय एवढा भाव..

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 19, 2024 2:50 PM

राज्यात आज सकाळपासून शेतकऱ्यांनी विविध बाजारसमितीत आज ९०१७ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणला होता. सर्वाधिक आवक आज अमरावती बाजारसमितीत झाली. ...

राज्यात आज सकाळपासून शेतकऱ्यांनी विविध बाजारसमितीत आज ९०१७ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणला होता. सर्वाधिक आवक आज अमरावती बाजारसमितीत झाली.  क्विंटलमागे शेतकऱ्यांना साधारण ४३२० रुपये दर मिळाला.

राज्यात आज बहुतांश ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची आवक झाली होती. शेतकऱ्यांना कमीत कमी ३५०० ते ४५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनच्या साठवणूकीलाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

विदर्भात सोयाबीनची अधिक आवक असून नागपूर मध्ये ११४ क्विंटल तर यवतमाळमध्ये ३२० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. मराठवाड्यातील आवक घटली आहे. छत्रपती संभाजीनगर आज केवळ १ क्विंटल सोयाबीन आज दाखल झाले. तर हिंगोलीत ८८ क्विंटल पिवळा सोयाबीन विक्रीसाठी आला होता.

जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव..

 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/03/2024
अहमदनगरपांढरा50430043004300
अमरावतीलोकल4257427543664320
बीडपिवळा130435045164476
बुलढाणापिवळा30430043004300
छत्रपती संभाजीनगर---1400040504025
हिंगोलीपिवळा88425043504300
जालनापिवळा27420044204325
नागपूरलोकल114410042754231
वाशिम---4000390044754250
यवतमाळपिवळा320450046004550
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)9017
टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड