Join us

सोलापुरात ९८५ ट्रक कांद्याची आवक; कसा सुरु आहे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 9:24 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटमधील कोलमडलेले नियोजन पूर्वपदावर येईनाच. दोन दिवसांच्या सुटीनंतर ९८५ ट्रक कांद्याची आवक होती. दरही एक हजार रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. गाड्या भरून पाठविण्यासाठी बुधवारी पुन्हा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटमधील कोलमडलेले नियोजन पूर्वपदावर येईनाच. दोन दिवसांच्या सुटीनंतर ९८५ ट्रक कांद्याची आवक होती. दरही एक हजार रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. गाड्या भरून पाठविण्यासाठी बुधवारी पुन्हा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक असते. मागील महिनाभरापासून दररोज ५०० पेक्षा अधिक ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस कांदा लिलाव बंद असल्यामुळे आवक वाढली आणि दरात मोठी घसरण झाली आहे. मागील आठवड्यात ३२०० रुपयांपर्यंत दर होता. मंगळवारी मात्र थेट २१०० रुपयांपर्यंत दर खाली आला. सरासरी चांगल्या कांद्यालाही ७०० ते ९०० रुपये दर मिळाला आहे. त्यामळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कांदा निर्यात बंदी झाल्यापासून कांद्याचा दर पडला आहे.

अधिक वाचा: तुरीला सोलापुरात मिळाला सर्वाधिक दर; काय मिळाला बाजारभाव

मात्र, सोलापूर मार्केटमध्ये आवक वाढतच आहे. राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत सोलापूरमध्ये चांगला दर मिळत होता. मात्र मंगळवारी अचानकपणे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना केलेला खर्च मिळत नसल्याचे सांगण्यात आले. आणखी महिनाभर कांद्याची मोठी राहणार आहे. कांद्यातून चार पैसे मिळतील, या आशेत शेतकरी बसले होते. मात्र, त्यांच्या आशेवर आता पाणी फिरले आहे.

दोन दिवस सुटी असल्यामुळे मंगळवारी आवक वाढली. त्यामुळे लिलाव संपल्यानंतर यार्डातील गाड्या भरून पाठविण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे बुधवारी लिलाव बंद ठेवल्याशिवाय पर्याय नाही. बुधवारी रात्री गाड्या सोडण्यात येणार आहेत. गुरुवारी लिलाव होईल. शेतकऱ्यांनी अंदाज घेऊन माल विक्रीसाठी आणावा. - केदार उंबरजे, व्यापारी संचालक, सोलापूर बाजार समिती

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरशेतकरी