Lokmat Agro >बाजारहाट > तुरीच्या दरात घसरण; तूर उत्पादक शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण

तुरीच्या दरात घसरण; तूर उत्पादक शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण

A fall in the price of pigeon pea; An atmosphere of confusion among pigeon pea producing farmers | तुरीच्या दरात घसरण; तूर उत्पादक शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण

तुरीच्या दरात घसरण; तूर उत्पादक शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण

पेरणीच्या तोंडावर तुरीच्या दरात घसरण..

पेरणीच्या तोंडावर तुरीच्या दरात घसरण..

शेअर :

Join us
Join usNext

वाशिम जिल्ह्यात खरीप पेरणी तोंडावर असताना बाजार समित्यांत तुरीच्या दरात घसरण होत असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी १२ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले तुरीचे दर आता अपवाद वगळता सर्वच बाजार समित्यांत १२ हजारांच्या खाली घसरले आहेत.

मंगळवारी वाशिमच्या बाजार समितीत जिल्ह्यात सर्वात कमी असे ११ हजार ८५१ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे कमाल दर तुरीला मिळाले. त्यापूर्वी सोमवारी मंगरुळपीरच्या बाजार समितीत तुरीला कमाल ११ हजार ७८५ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले. देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटले असतानाच गत हंगामात तुरीच्या क्षेत्रातही लक्षणीय घट झाली होती.

परिणामी, बाजारात तुरीच्या दरात तेजी आली होती. जिल्ह्यांतर्गत बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर १३ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले होते. उत्पादन घटले असताना दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता.

तुरीच्या दरात नंतर कमीअधिक प्रमाणात चढउतारही सुरू झाला आणि निवडणुकीपूर्वी तुरीचे दर ११ हजार रुपये प्रती क्विंटलच्या खाली घसरले होते. त्यानंतर तुरीच्या दरात पुन्हा तेजी येऊ लागली आणि तुरीचे दर मागील काही दिवसांतच १२ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते.

तथापि, मंगळवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसले. त्यात या दिवशी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला जिल्ह्यात सर्वात कमी असे ११ हजार ८५१ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले.

तुरीला कोठे किती दर

११८५१ - वाशिम

१२,२८५ - कारंजा

१२,००० - मानोरा

११,७८५ - मंगरुळपीर

वाशिम बाजार समितीत ३ हजार क्विंटलची आवक

जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीच्या दरात घसरण होत असल्याचे दिसत असले तरी तुरीची आवक मात्र वाढली आहे. वाशिमच्या बाजार समितीत मंगळवारी तब्बल ३ हजार क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर कारंजा बाजार समितीतही ७५० क्विंटल तुरीची आवक झाली होती. मंगरुळपीर आणि मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतही तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा - Dairy Success Story १५ म्हशींच्या संगोपनातून राहुल पाटील मिळवितात महिन्याला दीड लाखाचे उत्पन्न

Web Title: A fall in the price of pigeon pea; An atmosphere of confusion among pigeon pea producing farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.