Lokmat Agro >बाजारहाट > शेतकऱ्यांच्या लसणाला चांगले दिवस, ग्राहकांची 'लसणाची फोडणी' मात्र महागली

शेतकऱ्यांच्या लसणाला चांगले दिवस, ग्राहकांची 'लसणाची फोडणी' मात्र महागली

A good day for farmers' garlic, but garlic crushing became expensive for consumers | शेतकऱ्यांच्या लसणाला चांगले दिवस, ग्राहकांची 'लसणाची फोडणी' मात्र महागली

शेतकऱ्यांच्या लसणाला चांगले दिवस, ग्राहकांची 'लसणाची फोडणी' मात्र महागली

पुणे बाजार समितीत सर्वाधिक आवक, प्रतिकिलो दरवाढ

पुणे बाजार समितीत सर्वाधिक आवक, प्रतिकिलो दरवाढ

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात बहुतांशी भाजीपाल्यांच्या किमती वाढल्या असतानाच आता लसणाला प्रतिक्विंटल १५ हजार ते २७ हजारांपर्यंत दर मिळत आहे. लसूण उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. किरकोळ बाजारात प्रतिकिलो २५० ते ३०० रुपये द्यावे लागत असल्याने लसणाच्या फोडणीसाठी सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार असल्याचे चित्र आहे.

आज (दि. ६) पुणे बाजारपेठेत ४५८ क्विंटल एवढ्या सर्वाधिक लसणाची आवक झाली. प्रति क्विंटल कमीत कमी १५ हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला असून जास्तीत जास्त २७ हजार रुपये भाव मिळाला आहे.

अवकाळी पावसाने आधीच भाजीपाला व अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले असताना भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या आहेत. हिवाळ्यात आले आणि लसणाच्या मागणीत वाढ होत असते. दरम्यान दरही चढे असतात. मात्र, यंदा उत्पन्नात घट असल्यानेही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Onion Rate : लाल कांद्याची आवक घटली, आजचे लाल-उन्हाळ कांद्याचे बाजारभाव काय? 

दरम्यान कोणत्या बाजारसमितीत लसणाला काय भाव मिळाले जाणून घेऊया..

बाजार समिती

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

06/12/2023

श्रीरामपूर

---

क्विंटल

15

12000

17000

15000

राहता

---

क्विंटल

3

22000

24000

23000

नाशिक

हायब्रीड

क्विंटल

6

6500

22300

17000

कल्याण

हायब्रीड

क्विंटल

3

13000

16000

14500

अमरावती- फळ आणि भाजीपाला

लोकल

क्विंटल

318

12000

25000

18500

पुणे

लोकल

क्विंटल

458

15000

27000

21000

नागपूर

लोकल

क्विंटल

270

14000

24000

21500

 

Web Title: A good day for farmers' garlic, but garlic crushing became expensive for consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.