राज्यात बहुतांशी भाजीपाल्यांच्या किमती वाढल्या असतानाच आता लसणाला प्रतिक्विंटल १५ हजार ते २७ हजारांपर्यंत दर मिळत आहे. लसूण उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. किरकोळ बाजारात प्रतिकिलो २५० ते ३०० रुपये द्यावे लागत असल्याने लसणाच्या फोडणीसाठी सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार असल्याचे चित्र आहे.
आज (दि. ६) पुणे बाजारपेठेत ४५८ क्विंटल एवढ्या सर्वाधिक लसणाची आवक झाली. प्रति क्विंटल कमीत कमी १५ हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला असून जास्तीत जास्त २७ हजार रुपये भाव मिळाला आहे.
अवकाळी पावसाने आधीच भाजीपाला व अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले असताना भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या आहेत. हिवाळ्यात आले आणि लसणाच्या मागणीत वाढ होत असते. दरम्यान दरही चढे असतात. मात्र, यंदा उत्पन्नात घट असल्यानेही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Onion Rate : लाल कांद्याची आवक घटली, आजचे लाल-उन्हाळ कांद्याचे बाजारभाव काय?
दरम्यान कोणत्या बाजारसमितीत लसणाला काय भाव मिळाले जाणून घेऊया..
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
06/12/2023 | ||||||
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 15 | 12000 | 17000 | 15000 |
राहता | --- | क्विंटल | 3 | 22000 | 24000 | 23000 |
नाशिक | हायब्रीड | क्विंटल | 6 | 6500 | 22300 | 17000 |
कल्याण | हायब्रीड | क्विंटल | 3 | 13000 | 16000 | 14500 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 318 | 12000 | 25000 | 18500 |
पुणे | लोकल | क्विंटल | 458 | 15000 | 27000 | 21000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 270 | 14000 | 24000 | 21500 |