Lokmat Agro >बाजारहाट > नगरला सुरू होणार लाल कांदा खरेदी केंद्र

नगरला सुरू होणार लाल कांदा खरेदी केंद्र

A red onion buying center will be started in the Ahmednagar | नगरला सुरू होणार लाल कांदा खरेदी केंद्र

नगरला सुरू होणार लाल कांदा खरेदी केंद्र

नाशिक, संभाजीनगर आणि पुणे येथे कांदा उत्पादकांना मिळत असलेला बाजारभाव अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा, तसेच अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.

शेअर :

Join us
Join usNext

लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पीयूष गोयल यांची लोकसभा परिसरातील त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते. लोखडे यांनी गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली.

नाशिक, संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात सध्या २४.०३ रुपये प्रतिकिलो कांद्याचा खरेदी भाव आहे. मात्र, अहमदनगर (शिर्डी) येथे याच काद्याचे दर २०.७५ रुपये प्रतिकिलो आहेत. हे तीन रुपयांचे नुकसान भरून काढण्याकरिता केंद्रीय कृषी सचिवांमार्फत आदेश द्यावेत व जिल्ह्यातही २४.०३ रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी करण्याबाबतची विनंती केली.

Web Title: A red onion buying center will be started in the Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.