Join us

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज लासलगाव, पिंपळगावी कांद्याचे बाजारभाव असे होते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:35 PM

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची काल प्राणप्रतिष्ठा होती. त्यामुळे बाजारसमित्या दुपारी बंद होत्या. आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर कांद्याला असे बाजारभाव मिळाले आहेत.

काल अयोध्या येथील राम मंदिरात भव्य सोहळ्यात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना संपन्न झाली. त्यानिमित्त राज्य सरकारने सरकारी व निमसरकारी आस्थापनांना सुटी जाहीर केली होती. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लासलगाव, विंचूर, सह पुणे परिसरातील काही बाजारांत सकाळच्या सुमारास कांदा लिलाव सुरू होते.

दुपारी श्रीराम प्रतिष्ठापना उत्सवासाठी बाजारसमित्या बंद राहिल्या. आज दिनांक २३ जानेवारी रोजी प्रतिष्ठापना उत्सवानंतर पुन्हा बाजारसमित्या पूर्णवेळ सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आपले कांदे घेऊन पुन्हा बाजारसमित्यांकडे येत आहेत.

आज सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीची उपआवार असलेल्या विंचूर बाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १२७५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तर पिंपळगाव बाजारसमितीत पोळ कांद्याला कमीत कमी ४०१ तर सरासरी १३५० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. 

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
२३ जानेवारी २४
खेड-चाकण---200100018001500
लासलगाव - विंचूरलाल1300060014001275
पुणेलोकल1161760016001100
पिंपळगाव बसवंतपोळ1440040117001350
२२ जानेवारी २४
जुन्नर - नारायणगावचिंचवड1030020001500
बारामतीलाल59840030001400
लासलगाव - निफाडलाल290095113511300
लासलगाव - विंचूरलाल738040014001300
पेनलाल381300032003000
पुणेलोकल1143550017001100
पुणे-मांजरीलोकल46130022001700
पुणे-मोशीलोकल4354001200800
वाईलोकल10050015001000
मंगळवेढालोकल60820020001500
टॅग्स :अयोध्याकांदाराम मंदिर