Join us

लिंबू पाठोपाठ गवारही खातोय भाव; वाढत्या तापमानामुळे बाजारात आवक कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:54 IST

Vegetable Market : वाढत्या तापमानामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. किरकोळ बाजारात सर्वच भाज्या सध्या ६० ते ९० रुपये किलोदरम्यान मिळत आहेत. तर लिंबू सध्या ४० रुपये पाव मिळत असून, चार ते पाच रुपयांना एक नग विकला जात आहे.

वाढत्या तापमानामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. किरकोळ बाजारात सर्वच भाज्या सध्या ६० ते ९० रुपये किलोदरम्यान मिळत आहेत. तर लिंबू सध्या ४० रुपये पाव मिळत असून, चार ते पाच रुपयांना एक नग विकला जात आहे.

वाढती उष्णता, पाण्याची कमतरता यामुळे भाज्यांची आवक कमालीची मंदावली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत ३० टक्के आवक कमी झाल्याचे नंदुरबार येथील भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले.

सध्या मेथी, फ्लावर, गड्डाकोबी, गवार, दोडकी, गिलकी, सुरण, दुधी, काकडी भाव खात आहेत. किमान १५ ते २० रुपये पाव अशा दराने विक्री होत आहेत.

महिनाभर हीच स्थिती...

आणखी महिनाभर हीच स्थिती राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. काही शेतकरी हे ठोक भावात स्थानिक ठिकाणीच विक्री करतात. ते व्यापारी थेट मुंबई, सुरतला माल पाठवत असल्याचे सांगण्यात आले.

पालेभाज्याही कडाडल्या

मेथी, पालक, आंबाडी, तांदुळकी या भाज्या महागल्या आहेत. आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. 

काकडी, टोमॅटोला मागणी

सध्या काकडी व टोमॅटोलाही मागणी कायम आहे. काकडी ८० रुपये किलो तर टोमॅटो ४० रुपये किलो आहे

शेतकऱ्यांचे नुकसान

नुकत्याच झालेल्या गारपीट आणि पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने भाजीपाला आवक कमी झाली आहे.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील गवार आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/04/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23300045003750
खेड-चाकण---क्विंटल78400060005000
श्रीरामपूर---क्विंटल4400060005000
भुसावळ---क्विंटल1750075007500
राहता---क्विंटल5250060004200
पुणेलोकलक्विंटल184200060004000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1500050005000
पुणे-मोशीलोकलक्विंटल21600070006500
नागपूरलोकलक्विंटल20700075007375
कामठीलोकलक्विंटल2350045004000
रत्नागिरीनं. २क्विंटल23400060005000

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील लिंबू आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/04/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21500090007000
श्रीरामपूर---क्विंटल1280001200010000
राहता---क्विंटल45000100007500
अकलुजकागदीनग6850132
पुणेलोकलक्विंटल27050060003200
पुणे-मोशीलोकलक्विंटल3790001200010500
नागपूरलोकलक्विंटल40700080007750
भुसावळलोकलक्विंटल15800090008500

हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी

टॅग्स :बाजारशेतकरीभाज्याशेती क्षेत्रमार्केट यार्ड