Join us

कांद्यानंतर कापसाच्या दरालाही लागले ग्रहण! हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 7:01 PM

हिंगणा येथे केवळ ५ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर कापसाला मिळाला

मागच्या एका आठवड्यात कांद्याच्या दराने मान टाकली आहे, त्यानंतर कापसाचे दरही ७ हजारांच्या खाली आले असून हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला जात आहे. दरम्यान, कापसाचे दर वाढण्याची शक्यता आता शेतकऱ्यांनी सोडली आहे. 

केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर निश्चित केलेला असतानाही आज राज्यातील केवळ तीन बाजार समित्यांमध्ये ७ हजारांच्या वर दर मिळाला. तर एका बाजार समितीमध्ये केवळ ५ हजार ६०० दर मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर वाढण्यासंदर्भातील अनुकूल परिस्थिती असतानाही कापसाचे दर वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

आज अकोला (बोरगावमंजू) बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजेच ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल एवढा उच्चांकी दर मिळाला. तर हिंगणा येथे केवळ ५ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. त्यानंतर परभणी आणि फुलंब्री प्रत्येकी ७ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. हिंगणघाट येथे सर्वांत जास्त म्हणजेच ८ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला.  तर उपलब्ध माहितीनुसार आज १४ बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर मिळाला.

कापसाचे आजचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/12/2023
संगमनेर---क्विंटल130550070006250
सावनेर---क्विंटल3000665066756675
भद्रावती---क्विंटल486677070206895
मौदा---क्विंटल150630065856410
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1459660066606630
परभणीहायब्रीडक्विंटल775708071807100
अकोलालोकलक्विंटल96673070116870
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल82700075007250
उमरेडलोकलक्विंटल632650068406650
देउळगाव राजालोकलक्विंटल1336611570906950
वरोरालोकलक्विंटल2804645070006700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल834650069706700
काटोललोकलक्विंटल115630068006700
हिंगणालोकलक्विंटल12559363005600
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1525660070006850
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8000600071006500
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल612690072007100
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूसबाजार