Lokmat Agro >बाजारहाट > मुहूर्ताची खरेदी! शेतमालाला आज किती मिळाला दर?

मुहूर्ताची खरेदी! शेतमालाला आज किती मिळाला दर?

agriculture farmer produce rate price market yard diwali festival special selling | मुहूर्ताची खरेदी! शेतमालाला आज किती मिळाला दर?

मुहूर्ताची खरेदी! शेतमालाला आज किती मिळाला दर?

सांगलीमध्ये गूळ आणि हळदीची मुहुर्ताची खरेदी झाली

सांगलीमध्ये गूळ आणि हळदीची मुहुर्ताची खरेदी झाली

शेअर :

Join us
Join usNext

आज बलिप्रतिपदा. आजच्या दिवशी शेतकऱ्यांकडून बळीराजाची पूजा केला जाते. 'इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो' अशी इच्छा शेतकऱ्यांकडून केली जाते. तर दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर राज्यातील अनेक बाजार समित्यांत मुहुर्ताची खरेदी झाली. सांगलीमध्ये गूळ आणि हळदीची मुहुर्ताची खरेदी झाली असून हळदीला ११ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाल्याची माहिती आहे. दरम्यान, आजच्या मुहूर्ताच्या खरेदीवर सोयाबीनलाही चांगला दर मिळाला.

दरम्यान, दिवाळीच्या मुहुर्तावर शेतमालाचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण शेतमालाचे दर स्थिरच असल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. खरिपाच्या सोयाबीन, कापूस, कांदा, तूर या पिकाची बाजारात आवक होत असून हमीभावाच्या आसपास दर मिळताना दिसत आहेत. कांदा आणि सोयाबीनचे दर कमालीचे कमी असून शेतकऱ्यांना मातीमोल दरात विकावा लागत आहे.

सोयाबीनला आज चांगला दर मिळाला. ४ हजार ४०० ते ५ हजार १७० रूपये प्रतिक्विंटल या सरासरी दराने सोयाबीनची विक्री झाली. ३ हजार रूपये प्रतिक्विंटल ते ५ हजार २२१ रूपये प्रतिक्विंटल एवढा किमान तर ४ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल ते ५ हजार २६१ रूपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर सोयाबीनला मिळाला. तर कांद्याचे दर स्थिर असल्याचं दिसून आलं. २ हजार ३५० रूपये प्रतिक्विंटल ते ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर कांद्याला मिळाला आहे. 

आजचा सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/11/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल160300052115100
राहूरी -वांबोरी---क्विंटल37510052005155
परभणीलोकलक्विंटल920505051255111
ताडकळसनं. १क्विंटल705500051515051
लातूरपिवळाक्विंटल53067505852615100
जालनापिवळाक्विंटल10477400152515051
अक्कलकोटपिवळाक्विंटल100500152505100
परतूरपिवळाक्विंटल78511151715151
वरोरापिवळाक्विंटल78310050514400
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल3400048004400
आंबेजोबाईपिवळाक्विंटल2800500151515100
औसापिवळाक्विंटल10565450152745190
औराद शहाजानीपिवळाक्विंटल6085505051605105
मुखेडपिवळाक्विंटल190522152215221
उमरगापिवळाक्विंटल49495151005011
आष्टी-जालनापिवळाक्विंटल26449552305150
सोनपेठपिवळाक्विंटल1391505052305170

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/11/2023
कोल्हापूर---क्विंटल5968150050003400
राहूरी---क्विंटल1149020045002350
दौंड-केडगाव---क्विंटल1535270051004200
लासलगाव - विंचूरलालक्विंटल300300045014100
पुणेलोकलक्विंटल10001200046003300
पुणे- खडकीलोकलक्विंटल9350035003500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3300042003600
पुणे-मांजरीलोकलक्विंटल90260036003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल221150040002750
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल5150200045013750
भुसावळउन्हाळीक्विंटल7200035002500

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/11/2023
वरोरालोकलक्विंटल158705172117150

Web Title: agriculture farmer produce rate price market yard diwali festival special selling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.