शेखर देसाई/बिभिषण बागलकांदा निर्यात शुल्क ४० टक्के जाहीर झाल्याच्या निषेधार्थ लासलगाव बाजार समितीचे नाशिक जिल्ह्यातील सर सर्व बाजार समित्या बेमुदत बंद झाल्या असून लासलगाव बाजार समितीच्या आवारावर आज एकही ट्रॅक्टर सकाळपासून दिसला नाही आज लिलाव बंद राहिल्याने किमान दोन ते तीन कोटी रुपयांचा आर्थिक उलढलीस मोठे ग्रहण लागणार आहे. व्यापारी वर्ग बेमुदत बंद साठी ठाम असल्याने या लिलाव बंदची कोंडी कशी फुटणार ही प्रशासनापुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
शनिवारी रात्री हा निर्णय झाल्यानंतर विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांसह सामान्य शेतकरी देखील कांदा उत्पादकांना लक्ष केल्याबद्दल मोदी सरकार विरोधात जोरदार सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसून येत आहे या सोशल मीडियावर होणाऱ्या पोस्टमुळे येथे निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यताही दिसत आहे. लासलगाव बाजार समिती गजबजलेली बाजार समिती आहे आज लिलाव बंद असल्याने किमान दोन ते तीन लाख रुपयांची चलन दळणवळण ठप्प झालेले आहे तर जिल्ह्यात २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कांदा निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ बंदला सुरवात लिलावात शुकशुकाट दिसून आला.
कांदा निर्यात शुल्क ४० टक्के जाहीर झाल्याच्या निषेधार्थ लासलगाव बाजार समितीचे नाशिक जिल्ह्यातील सर सर्व बाजार समित्या बेमुदत बंद यावर पणन संचालनालय मोहन निंबाळकर (उपसंचालक) यांच्याशी लोकमत अॅग्रोने चर्चा केली त्यावेळी त्यांनी बाजार समितींना पूर्वपरवानगी शिवाय समितींचे कामकाज, खरेदी-विक्री बंद ठेवता येणार नाही असे करणे बेकायदेशीर राहील, संबंधित बाजार समित्यांना लिलाव प्रक्रिया सुरु ठेवण्यासाठी परिपत्रक काढू असे सांगण्यात आले.
कांदा निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवले असल्याची माहिती नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी व निर्यातदार यांची लासलगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सदरचा निर्णय शेतकऱ्यांपर्यंत उशिरा पोहोचणार असल्याने जर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आली तर ते लिलाव काढून त्यानंतर बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या अनेक संघटनांच्या विनंतीनुसार सदरचा बेमुदत बंद चा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला असून या मीटिंगची कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
या बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे, सोहनलाल भंडारी, नीतीन ठक्कर, नितीन जैन, मनोज जैन, नंदकुमार डागा, नंदकुमार अट्टल, रिकबचंद ललवाणी, नितीन कदम, भिका कोतकर, रामराव सूर्यवंशी, दिनेश देवरे, पंकज ओस्तवाल जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. केंद्र सरकारची अधिसूचना निघण्याअगोदर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कांदा हा निर्यातीसाठी रवाना झाल्याने रस्त्यातच हा माल अडकला आहे याचा मोठ्या प्रमाणात फटका व्यापाऱ्यांना बसला असल्याची चर्चा या बैठकीत झाली.