Lokmat Agro >बाजारहाट > कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर आकारल्याने उद्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बंद

कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर आकारल्याने उद्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बंद

All onion markets in Nashik district will be closed tomorrow due to levy of 40 percent tax on onion export | कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर आकारल्याने उद्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बंद

कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर आकारल्याने उद्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बंद

उद्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ नाशिक लासलगाव तसेच नाशिक परिसरातील सर्व कांदा बाजारपेठ खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारला आहे.

उद्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ नाशिक लासलगाव तसेच नाशिक परिसरातील सर्व कांदा बाजारपेठ खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बाजारपेठेतील भाववाढ थांबविण्यासाठी  केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. हे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असणार आहे. या निर्णया विरोधात उद्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठनाशिक लासलगाव तसेच नाशिक परिसरातील सर्व कांदा बाजारपेठ खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारला आहे. आता यात शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. 

अशातच आता केंद्र सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (सोमवार) २५ रुपये किलो या किरकोळ दराने कांद्याची विक्री राष्ट्रीय भारतीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) च्या माध्यमातून करणार आहे. कांद्याच्या ३.०० लाख मेट्रिक टन प्राथमिक खरेदीचे उद्दिष्ट गाठल्यानंतर, सरकारने यावर्षी कांद्याच्या राखीव साठ्याचे (बफर) प्रमाण ५.०० लाख मेट्रिक टन केले.

प्रमुख बाजारपेठेत कांदा पाठवण्याव्यतिरिक्त, बफरमधील कांदा किरकोळ ग्राहकांना देखील २५/- प्रति किलो अनुदानित दराने किरकोळ दुकाने आणि एनसीसीएफच्या फिरत्या वाहनाद्वारे उद्यापासून म्हणजेच सोमवार २१ ऑगस्ट २०२३ पासून उपलब्ध करून दिला जाणार आहे. इतर संस्था आणि ई-वाणिज्य मंचाचा समावेश करून आगामी काळात कांद्याची किरकोळ विक्री योग्यरित्या वाढवली जाईल.

Web Title: All onion markets in Nashik district will be closed tomorrow due to levy of 40 percent tax on onion export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.