Join us

कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर आकारल्याने उद्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बंद

By बिभिषण बागल | Published: August 20, 2023 8:55 PM

उद्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ नाशिक लासलगाव तसेच नाशिक परिसरातील सर्व कांदा बाजारपेठ खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारला आहे.

बाजारपेठेतील भाववाढ थांबविण्यासाठी  केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. हे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असणार आहे. या निर्णया विरोधात उद्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठनाशिक लासलगाव तसेच नाशिक परिसरातील सर्व कांदा बाजारपेठ खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारला आहे. आता यात शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. 

अशातच आता केंद्र सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (सोमवार) २५ रुपये किलो या किरकोळ दराने कांद्याची विक्री राष्ट्रीय भारतीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) च्या माध्यमातून करणार आहे. कांद्याच्या ३.०० लाख मेट्रिक टन प्राथमिक खरेदीचे उद्दिष्ट गाठल्यानंतर, सरकारने यावर्षी कांद्याच्या राखीव साठ्याचे (बफर) प्रमाण ५.०० लाख मेट्रिक टन केले.

प्रमुख बाजारपेठेत कांदा पाठवण्याव्यतिरिक्त, बफरमधील कांदा किरकोळ ग्राहकांना देखील २५/- प्रति किलो अनुदानित दराने किरकोळ दुकाने आणि एनसीसीएफच्या फिरत्या वाहनाद्वारे उद्यापासून म्हणजेच सोमवार २१ ऑगस्ट २०२३ पासून उपलब्ध करून दिला जाणार आहे. इतर संस्था आणि ई-वाणिज्य मंचाचा समावेश करून आगामी काळात कांद्याची किरकोळ विक्री योग्यरित्या वाढवली जाईल.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डनाशिकशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती