Lokmat Agro >बाजारहाट > असू द्या कोणताही वार, बाजारात भाव खातेय गवार

असू द्या कोणताही वार, बाजारात भाव खातेय गवार

any day in week, cluster bean prices in the market are going up | असू द्या कोणताही वार, बाजारात भाव खातेय गवार

असू द्या कोणताही वार, बाजारात भाव खातेय गवार

लहरी पावसामुळे घटलेले अल्प उत्पादन, मागणीत झालेली वाढ दररोज बदलणारे हवामान व अलीकडेच थंडीमुळे वातावरणात बदलामुळे भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत.

लहरी पावसामुळे घटलेले अल्प उत्पादन, मागणीत झालेली वाढ दररोज बदलणारे हवामान व अलीकडेच थंडीमुळे वातावरणात बदलामुळे भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

लहरी पावसामुळे घटलेले अल्प उत्पादन, मागणीत झालेली वाढ दररोज बदलणारे हवामान व अलीकडेच थंडीमुळे वातावरणात बदलामुळे भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. मुंबई, नागपूर आणि पुण्यात भाजीपाला महागला आहे. सोलपूरमध्ये तर खाद्यतेलापेक्षा वांगी, गवार, शेवगा महागली आहे.

सोलापूरमध्ये एक किलो गवार १६० रुपयांना मिळतेय. त्यामुळे आठवड्यात कोणताही दिवस असू द्या, बाजारात भाव खातेय गवार असे म्हणण्याची वेळ आली आहे. कोथिंबीर, शेप्पू, कांदापात, चाकवत, करडई, चुका, पालक, मेथी स्वस्त झाली असल्याची माहिती घाऊक भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली. काहीशी तुरट चव असणारी गवारीची भाजी कुणालाच फारशी आवडत नाही. पण खरं सांगायचं तर गवारीची भाजी खूप छान लागते. गवारच्या शेंगांमध्ये प्रथिने आणि फायबर समृद्ध प्रमाणात असतात. याशिवाय यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम आहारात गवारीची भाजी वजन नियंत्रणात राहते. तसेच, हृदयविकार दूर राहतात. हे उपयुक्त घटक आढळतात. खाण्याने गृहिणींची त्यामुळे पहिली पसंती गवारीला असते.

गवार का महागली?
हॉटेलमध्ये फारच कमी मागणी असलेली गवार गृहिणींच्या मात्र पहिल्या पसंतीची. पावसाळी वातावरणात गवारीच्या उत्पन्नात घट झाली. आवक खाली आली आहे. त्यात गवार पहिल्या पसंतीची असल्याने तिचे भाव नेहमीच चढे राहतात. त्याचाच परिणाम म्हणून आवक कमी झाल्याने गवारने दीडशेचा टप्पा गाठला आहे.

असे आहेत दर
गवारची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. गवारचा दर प्रतिकिलो १२० ते १६० रुपये इतका आहे, तर भेंडी ११०-१४०, वांगी १२०-१६०, घेवडा ८०- १००, लसूण २२०-३०० रुपयांवर स्थिर आहेत.

Web Title: any day in week, cluster bean prices in the market are going up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.