Join us

पोळ्यासाठी परराज्यातून आली तब्बल ४० लाख नारळं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 8:00 PM

पोळा सणाच्या निमित्ताने बाजारात सहा कोटी रुपये किमतीचे ४० लाख नारळ उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्यात केरळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ...

पोळा सणाच्या निमित्ताने बाजारात सहा कोटी रुपये किमतीचे ४० लाख नारळ उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्यात केरळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणांहून नारळ दाखल झाले.

बीड  जिल्हाभरातील १५ हजार ७५४ परवानाधारक किराणा दुकानांसाठी प्रत्येकी दोनशे ते अडीचशे नारळ विक्रीसाठी खरेदी केले आहेत. यावर्षी नारळाच्या किमतींत दरवाढ झालेली नसून भाव स्थिर आहेत. श्रावण महिना व पोळ्याच्या निमित्ताने नारळाला महिनाभर मोठी मागणी असते. विक्रेते महिनाभर अगोदरच नारळ खरेदी करीत आहेत. याअनुषंगाने नारळांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून पोळ्यापर्यंत सहा कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे.

कोणत्या नारळाला मागणी?

ओला व सुका नारळ दोन्हीही सारख्याच किमतीत मिळत असून नारळानुसार किंमत ठरते. ग्रामीण भागातील प्रत्येक देवी-देवताला व पूजन करण्यासाठी एका शेतकऱ्याला १० ते १५ नारळ लागतात; मात्र ओला नारळ अल्प कालावधीत संपवणे शक्य नसते. यामुळे सुक्या नारळाची मागणी जास्त आहे; परंतु या दिवसांत सुका नारळ कमी मिळतो, असे व्यापायांनी सांगितले.

अशा आहेत नारळाच्या किमती

■ ठोक विक्रेते, प्रतिनग ९ ते १०.४५ रुपये■ किराणा दुकान- २०.७५, ११, ११.४५ ते १२ रुपये

■ ग्राहक खरेदी १४, १५, १८ 

■ किरकोळ विक्रेते २०,२१. २२ रुपयापर्यंत. तसेच नारळाच्या आकारमानानुसार भाव ठरवले जातात.

या राज्यांतून आले नारळ

कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा व कोकण किनारपट्टी

शहरात दुकान असल्याने नारळाला ग्रामीण भागाएवढा प्रतिसाद मिळत नाही; मात्र तीनशे नारळ या काळात विकले जातात. अनेक दिवसांपर्यंत नारळ खराब न होता राहू शकते. यामुळे केरळच्या व्यापायांकडून ५०० नारळ खरेदी केले आहेत.- नितीन दुधाळ, व्यापारी, बीड

जिल्ह्यात किराणा दुकाने किती ?

  • अन्न व सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्यानुसार जिल्ह्यात एकूण १५ हजार ७५४ परवानाधारक किराणा दुकाने आहेत. यामध्ये, वार्षिक उत्पन्न १२ लाखांपेक्षा अधिक असणारी १९२८ दुकाने आहेत. 
  •  १२ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणारी १३ हजार ८२६ किराणा दुकाने आहेत. सर्व दुकानांमध्ये सरासरी २०० ते २५० नारळ विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
टॅग्स :मार्केट यार्डबीडशेतकरीशेतीबाजारपैसा