Join us

आवक वाढताच हरभऱ्याच्या दरात घसरण, कसा मिळाला सर्वसाधारण भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 11:17 AM

लातूर  बाजार समितीत शनिवारी शेतीमालाची आवक थोड्याशा प्रमाणात वाढली. परिणामी, हरभऱ्याच्या दरात शंभर रुपयांची घसरण झाली. ६ हजार १०० ...

लातूर बाजार समितीत शनिवारी शेतीमालाची आवक थोड्याशा प्रमाणात वाढली. परिणामी, हरभऱ्याच्या दरात शंभर रुपयांची घसरण झाली. ६ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा सर्वसाधारण भाव मिळाला आहे. दरम्यान, सोयाबीनचे दर स्थिर असल्याचे पाहावयास मिळत आहेत.

सध्या रब्बी हंगाम संपुष्टात आल्याने लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती शेतमालाची आवक कमी झाली आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे करीत आहेत. कुळवणी, नांगरणी, बांध बंदिस्ती, नाला सरळीकरण, शेतातील दसकट वेचणे अशी कामे करीत आहेत. दरम्यान, शेती मशागतीच्या कामांसाठी काही शेतकऱ्यांना आर्थिक अडचण जाणवत आहे. त्यामुळे हे शेतकरी शेतमाल विक्री करून गरज भागवित आहेत. 

दोन वर्षापूर्वी सोयाबीनला सर्वोच्च भाव मिळाला होता. त्यामुळे आगामी काळात असाच चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीकडे लक्ष केंद्रित केले. परंतु, गेल्या दोन वर्षांत दर सर्वाधिक भावापर्यंत मिळाला नाही. आगामी काळात दरवाढ होईल, अशा अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही. आता आर्थिक अडचणींमुळे ते विक्री करीत आहेत. मात्र, दर हमीभावापेक्षा कमी मिळत आहे.

शेतमाल: हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/04/2024
अहमदनगर---क्विंटल8400057005650
अहमदनगरलोकलक्विंटल37525158515714
अहमदनगरलालक्विंटल15570057005700
अकोलालोकलक्विंटल1786511363885888
अकोलाचाफाक्विंटल20550060005800
अकोलाकाबुलीक्विंटल6600084057202
अमरावती---क्विंटल155550058005650
अमरावतीलोकलक्विंटल1305580061405970
बीड---क्विंटल281560160455900
बुलढाणालोकलक्विंटल251545056685559
चंद्रपुरलोकलक्विंटल117560060005800
चंद्रपुरलालक्विंटल113528859005688
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2564056405640
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल31480159315849
छत्रपती संभाजीनगरकाबुलीक्विंटल13596661266071
धाराशिवलोकलक्विंटल6590059005900
धाराशिवगरडाक्विंटल4565057105700
धाराशिवकाट्याक्विंटल25585058505850
धाराशिवलालक्विंटल410530065305915
धुळेलालक्विंटल28546556155555
हिंगोली---क्विंटल600565061505900
जळगाव---क्विंटल80565058105711
जळगावनं. १क्विंटल50580060005900
जळगावकाबुलीक्विंटल25810082008200
जालनालोकलक्विंटल908558358855708
जालनाकाबुलीक्विंटल587000103509700
लातूरलोकलक्विंटल3600060256012
लातूरलालक्विंटल251625064086329
नागपूरलोकलक्विंटल3185522460625786
नांदेड---क्विंटल7563059115770
नांदेडलालक्विंटल83560058005700
नाशिकलोकलक्विंटल30580059435900
पुणे---क्विंटल39650072006850
सांगलीलोकलक्विंटल21536055305450
साताराचाफाक्विंटल50570059005800
सोलापूर---क्विंटल615700580005750
सोलापूरलोकलक्विंटल69560063856000
सोलापूरपिवळाक्विंटल63580063006005
वर्धालोकलक्विंटल635460059035645
वाशिम---क्विंटल1540564560505815
वाशिमचाफाक्विंटल60555058005700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)12431
टॅग्स :हरभराबाजारमार्केट यार्ड