हिवाळ्यात सदृढ आरोग्यासाठी सुकामेव्याला अधिक पसंती दिली जात असल्याने गंगापूरच्या बाजारात ग्राहकांकडून काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, चारोळी, खारीक, खजूर, मनुक्यासह अन्य सुकामेवा पदार्थाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
पहिल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढल्याने सकस आहारावर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे मेथीचे लाडू तयार करण्यासाठी गंगापूरच्या बाजारात खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू झाली आहे. यासोबत सुकामेवा विक्रेते दारोदार आपला माल विकण्यासाठी रस्त्यावर दिसून येत आहेत.
...असे आहेत दर (सर्व दर १ किलोचे)
सुकामेव्याच्या लाडूंच्या साहित्याचा बाजार गरम आहे. खोबरे, काजू, मनुके व अन्य पदार्थांची महाराष्ट्रसह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतून आयात केली सध्या बाजारात डिंक, मेथी व जाते. दरवर्षी इंधनाच्या दरात व बाजारभाव किमतीत वाढ होत पडण्यास मदत होते. त्यामुळे असल्याने सुकामेवा महागला आहे.
दहा दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्याने पोषक असलेल्या पदार्थाना विशेष मागणी आहे. त्यामुळे सुकामेवा आणि लाडू यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी घरोघरी पौष्टिक लाडू तयार केले जायचे; मात्र हे प्रमाण सध्या कमी झाले आहे. तरी हिवाळ्यात हे प्रमाण टिकून आहे. त्यामुळे सुकामेव्याचे पदार्थ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. - ज्ञानेश्वर चौधरी, विक्रेता, गंगापूर
सुकामेवा कधी व कसा खावा?
सुकामेवा खाताना तो नेहमी रात्री सुकामेवा भिजून ठेवून खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे सेवन पाण्यामध्ये भिजवून ठेवणे आणि पचन यंत्रणेला चालना मिळते.तसेच पोटातील घातक विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे सुकामेवा खाताना तो नेहमी रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते.
असे आहेत दर...
अंजीर 800 ते 1200
खारीक 160 ते 360
खोबरं 120 ते 140
काजू 720 ते 1000
बदाम 600 ते 900
किसमिस 220 ते 400
पिस्ता 960 ते 1000
मेथी 90 ते 100
गोडंबी 800 ते 1100
डिंक 300 ते 320