जगभरतात वाढणाऱ्या शाकाहारी आणि व्हिगनच्या ट्रेंडमुळे जागतिक बाजारपेठेत बेबी गाजरांची मागणी वाढली आहे. 2021-2026 च्या अंदाज कालावधीत 4.1 टक्क्यांच्या चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (CAGR) नोंदवण्याचा अंदाज आहे.
सामान्य गाजरापेक्षा आकाराने लहान असणाऱ्या या गाजराला कॉन्टिनेन्टल जेवणात मोठ्या प्रमाणात वापरले जाते.जागतिक बाजारपेठेत हे गाजर चांगलाच भाव खाताना दिसत आहे.जगात स्वयंपाक, सॅलड्स आणि स्नॅक्समध्ये लोकप्रियपणे वापरले जातात किंवा जवळजवळ प्रत्येक घरात कच्चे सेवन केले जातात. अमेरिका, जर्मनी, कॅनडा, फ्रान्स, बेल्जियम हे या बेबी गाजराचे सर्वात मोठे आयातदार आहेत.
काय आहेत गुणधर्म
गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते आणि त्यात जीवनसत्त्वे सी आणि के, पोटॅशियम, इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि आहारातील फायबर असतात.
सामान्य गाजरापेक्षा या गाजरात काय वेगळे?
सामान्य गाजरापेक्षा आकाराने लहान असणारी ही बेबी गाजरे अधिक गोड असतात कारण या गाजराला बनवण्यासाठी नेहमीच्या गाजरांच्याच पण गोड जातींचा वापर केला जातो. आपण वापरतो ती गाजरे आणि बेबी गाजरे ही दोन्ही उच्च पोषण आणि निरोगी भाजी आहे.
शाकाहारी ट्रेंडमुळे या गाजरांची चलती
शाकाहारी आणि व्हिगन ट्रेंडमुळे इतर जंक फूडऐवजी स्नॅक म्हणून वापरल्या जाणार्या बेबी गाजरांची मागणी वाढती आहे. सेंद्रिय गाजर आणि गाजरांच्या रसांची वाढती मागणी लक्षात घेता ग्राहकांची या बेबी गाजरांसाठी पंसती वाढती आहे.
कुठे होते उत्पदन?
तर चीन, युनायटेड स्टेट्स, युक्रेन, उझबेकिस्तान आणि रशिया हे सर्वात मोठे उत्पादक आहेत.
लक्ष्य बाजारपेठ कोणती?
तरुण ग्राहकांसाठी गाजरांसाठी ही एक उत्तम लक्ष्य बाजारपेठ आहे. कारण ही गाजरं गोड भाज्यांपैकी एक आहे आणि भाज्यांमधील त्याच्या विशिष्ट सजावटीमुळे आणि उपस्थितीमुळे मुलांना या गाजरांचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे पालकांसाठी विक्रीचा हा एक सोपा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे.