Lokmat Agro >बाजारहाट > बळीराजा मेटाकुटीला : बाजारात मुगा पाठोपाठ उडीदालाही समाधानकारक भाव मिळेना!

बळीराजा मेटाकुटीला : बाजारात मुगा पाठोपाठ उडीदालाही समाधानकारक भाव मिळेना!

Baliraja Metakutila: After Muga in the market, even Udida did not get a satisfactory price! | बळीराजा मेटाकुटीला : बाजारात मुगा पाठोपाठ उडीदालाही समाधानकारक भाव मिळेना!

बळीराजा मेटाकुटीला : बाजारात मुगा पाठोपाठ उडीदालाही समाधानकारक भाव मिळेना!

यंदा पावसाचे वेळेत आगमन झाल्याने बहुतांश भागात मृगात पेरणी आटोपली. त्यामुळे मूग, उडदाचा पेरा गतवर्षीच्या तुलनेत वाढला होता. परंतु, मूग, उडीद भरात असताना पावसाची उघडीप आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यंदा पावसाचे वेळेत आगमन झाल्याने बहुतांश भागात मृगात पेरणी आटोपली. त्यामुळे मूग, उडदाचा पेरा गतवर्षीच्या तुलनेत वाढला होता. परंतु, मूग, उडीद भरात असताना पावसाची उघडीप आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे.

मागील तीन - चार वर्षांत पावसाचा लहरीपणा पिकांना मारक ठरत आहे. वेळेवर पावसाला सुरुवात होत नसल्याने पेरण्या लांबल्या. यंदा मात्र मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने खरिपाची पेरणी बहुतांश भागात मृग नक्षत्रातच अटोपली. मृगात मूग,उडदाची पेरणी झाली तर उत्पादन चांगले होते, असे जाणकार शेतकरी सांगतात. यंदा मूग, उडदाचा पेन्ऱ्यात वाढ झाली.

परंतु, मध्यंतरी पावसाने दोन ते तीन वेळा उघडीप दिल्याने फटका बसला. तर पीक ऐन भरात असताना किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली. जिल्ह्यातील बहुतांश भागात मुगाची काढणी आटोपली आहे. परंतु, अपेक्षित उत्पादन झाले नाही. तर उडदाचीही वेगळी परिस्थिती नसून, उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मूग दहा हजार तर उडीद पडत्या भावात...

■ गत पाच दहा वर्षात मूग, उडदाच्या पेऱ्यात प्रचंड घट झाली आहे. त्यात पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन कमी होते. त्यामुळे मुगाला बऱ्यापैकी भाव मिळतो.

■ परंतु, उडदाला समाधानकारक भाव मिळत आहे. हिंगोलीच्या मोंढ्यात सध्या उडदाला सरासरी २ हजार ७५० रूपये क्विंटल तर मूग ९ हजार ८०० रुपये क्विंटलने विक्री होत आहे. उडदाच्या भाव वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

Web Title: Baliraja Metakutila: After Muga in the market, even Udida did not get a satisfactory price!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.