Lokmat Agro >बाजारहाट > Banana Market केळीला तुटपुंजा भाव; शेतकरी हवालदिल

Banana Market केळीला तुटपुंजा भाव; शेतकरी हवालदिल

Banana Market Measly Price for Bananas; Farmer Havaldil | Banana Market केळीला तुटपुंजा भाव; शेतकरी हवालदिल

Banana Market केळीला तुटपुंजा भाव; शेतकरी हवालदिल

आंबा संपल्यानंतर केळीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकरी होता. परंतु आंबा संपला तरी भाववाढ झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. केळीवर झालेला खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नैसर्गिक संकट, पाणी टंचाई व लागवडीसाठी खूप मोठा खर्च करून जतन केलेल्या केळीला तुटपुंजा भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये २५०० ते २००० हजार रुपये दर होता. यावर्षी मे महिन्यात २००० ते १५०० रुपये भाव मिळाला. मात्र आता एक हजार ते नऊशे रुपये भाव मिळत आहे.

आंबा संपल्यानंतर केळीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकरी होता. परंतु आंबा संपला तरी भाववाढ झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. केळीवर झालेला खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका व परिसर हा केळीसाठी देशभर ओळखला जातो. गेल्या वर्षी झालेला पाऊस व इसापूर धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळाल्याने मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली गेली. परंतु तापमान वाढल्यामुळे केळीच्या बागांवर मोठा परिणाम झाला होता. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस करून केळीच्या मळ्याची जोपासना केली. मात्र मे महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

केळी वाढणीचा हंगाम सुरू झाला असून जून ते ऑगस्ट काळ मुख्य काढणीचा असतो. यंदा काढणीच्या पहिल्या महिन्यात भाव समाधानकारक राहिला. मे महिन्यात २००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल जून महिन्यात १५०० ते १२०० रुपये झाला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात १२०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १००० ते ९०० रुपये भाव मिळत आहे.

केळीवर केलेला खर्च निघेना

यंदा पाच हजार केळीची लागवड केली असून साडेतीन हजार घडांची काढणी झाली आहे. परंतु यंदा मात्र कवडीमोल दर लागल्याने समाधानकारक पैसे मिळाले नाही. - भास्कर तरोडकर, शेतकरी.

यंदा आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. खरेदीदार आंबा खरेदी करीत होते, तेव्हा केळीला दर मिळत नव्हता. परंतु आंबा संपला तरी केळीच्या दरात वाढ झाली नाही. केळीवर केलेला खर्चही निघणे आवघड झाले आहे. - राजकुमार मदने, शेतकरी.

हेही वाचा - Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

Web Title: Banana Market Measly Price for Bananas; Farmer Havaldil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.