जालना : दिवाळीनिमित्त सुके खोबरे महागले असून, ते २०० रुपये किलो झाले आहे; तर आवक घटल्याने केळीचेही दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातगाड्यांवर घेऊन बसलेल्या केळीवाल्या विक्रेत्यांनी दिवाळीत केळीचा दरही ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर केला असल्याचे दिसून आले आहे.
बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीची लगबग दिसत आहे. यात दिवाळीच्या फराळामध्ये महत्त्वाचा घटक असलेले सुके खोबरे महागले आहे. त्यात भावबीजनिमित्त लाडक्या भावाला ओवाळताना करदोड्यांसोबत देण्यात येणाऱ्या केळ्यांच्याही दरात मोठी वाढ झाली आहे.
ग्रामीण भागात तर केळी काही जणांनी चांगल्या प्रतीच्या केळी १०० रूपये डझन दिल्याचे दिसून आले. यात अनेकजण मिठाईचीही खरेदी करतात. पण, त्यातही २० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा महागाईची झळ सहन करावी लागत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सरू आहे.
कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील केळी आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
01/11/2024 | ||||||
नाशिक | भुसावळी | क्विंटल | 220 | 900 | 1900 | 1500 |
पुणे | लोकल | क्विंटल | 5 | 800 | 1200 | 1000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 64 | 1500 | 7000 | 4250 |