Join us

Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 11:40 AM

जून महिन्यात केळीचे दर गडगडले असले तरी श्रावण महिन्यात केळीला मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत केळीला प्रति क्विंटल १८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर बाजारात पिकलेली केळी ५० रुपये डझनप्रमाणे घ्यावी लागत आहे.

जून महिन्यात केळीचे दर गडगडले असले तरी श्रावण महिन्यात केळीला मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत केळीला प्रति क्विंटल १८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर बाजारात पिकलेली केळी ५० रुपये डझनप्रमाणे घ्यावी लागत आहे. दर वाढले असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात केळीचे विक्रमी उत्पादन काढणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असले तरी यावर्षी केळीचे दर गडगडले होते. १३०० रुपयांपर्यंत केळीला दर मिळाला होता. जूनमध्ये केळी ८०० रुपयांपर्यंत गेली होती. त्यावेळी सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता.

सद्य:स्थितीत केळीला १८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळू लागला आहे. तालुक्यातील गिरगाव, सोमठाणा, किन्होळा, बोरगाव, नेहरूनगर आदी भागांत काही शेतकऱ्यांकडे केळी बागा आहेत. दरवर्षीच तालुक्यात केळी उत्पादक हे केळीची लागवड करतात. वसमत तालुका केळी व हळद उत्पादनाबाबत नेहमीच अग्रेसर आहे. जून महिन्यामध्ये केळीचे दर ८०० रुपयांपर्यंत केळीचे दर पुढे गेले होते.

त्यामुळे चालून वाढतील, अशी अशा शेतकऱ्यांना नव्हती. परंतु श्रावण महिन्यात केळीची मागणी वाढताच केळीला २ हजार प्रति क्विंटल दर मिळत आहे. भाव समाधानकारक मिळत असल्याने वसमत तालुक्यातील शेतकरी केळी लागवडीकडे वळला आहे.

खर्चाच्या मानाने भाव समाधानकारक

वसमत तालुक्यात चार हजार केळी बागांची लागवड केली आहे. केळी लागवड खर्च जास्त प्रमाणात लागतो. त्या मानाने सध्या मिळत असलेला भाव समाधानकारक आहे. - शेख एजाज, शेतकरी.

वसमतच्या केळीला विदेशातही मागणी

वसमत तालुक्यातील केळीला राज्यासह विदेशात मागणी आहे. केळी बागा तालुक्यात जास्त असून दर्जेदार केळीला दर चांगले मिळत आहेत. १८०० ते २००० प्रति क्विंटल दर केळीला मिळतो आहे. यापेक्षाही जास्त केळीला दर मिळतील. - असद शेख नूर, व्यापारी.

केळी लागवडीवर शेतकऱ्यांचा भर

केळीला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी केळी लागवडीला प्राधान्य देत आहे. सध्या केळी लागवडीची प्रक्रिया सुरू असून, गिरगाव, सोमठाणा, किन्होळा, बोरगाव भागातील शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

हेही वाचा - Banana Farming Success Story : तरुण शेतकरी करतोय डोंगराळ भागात केळीची शेती; तीन एकरांत मिळणार २२ लाखांचे उत्पन्न

टॅग्स :केळीबाजारशेतीहिंगोलीशेतकरीशेती क्षेत्रफळेश्रावण स्पेशल