Join us

Banana Market: तोडणी सुरु होताच केळीचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 10:50 IST

Banana Market: सध्या सर्वत्र केळीच्या बागा सुरु झाल्या आहेत, बाजारात केळीची आवक देखील वाढली आहे. त्यामुळे आता बाजारात केळीला (Banana Market) प्रति क्विंटल काय दर मिळताेय ते वाचा सविस्तर

Banana Market : केळी बागांची तोडणी सुरू होताच केळीचे दर गडगडले आहेत. जानेवारी महिन्यात २ हजार रुपये क्विंटल असणारे दर मार्चमध्ये १३०० रुपयांवर आल्याने केळी उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. (Banana Market)

वसमत तालुक्यात केळीचे विक्रमी उत्पादन काढणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात केळीला दोन हजार असा समाधानकारक दर मिळाला. हे दर कायम टिकून राहतील, अशी आशा शेतकरी व व्यापाऱ्यांना होती. (Banana Market)

मार्चअखेर केळीचे दर गडगडले आहेत. दोन हजारावरून आता १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. महिना ते दीड महिन्यात क्विंटलमागे शेतकऱ्यांना ७०० ते ८०० रुपयांचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'या' भागात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन

वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, खाजनापुरवाडी, पार्डी बा, दाभडी, परजना, वसमत, सोमठाणा, किन्होळा, बोरगाव, नेहरूनगर यासह कळमनुरीत तालुक्यातील दांडेगाव, डोंगरखडा या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेत आहेत.

बागा सुरू होताच दर घसरले....

* सध्या सर्वत्र केळीच्या बागा सुरु झाल्या आहेत, बाजारात केळीची आवक देखील वाढली आहे. त्यामुळे दरात मोठी घसरण पाहावयास मिळत आहे.

* जानेवारी महिन्यात केळीला मोठी मागणी होती. दर ही दोन हजारांवर गेले होते. नवीन बागांना सुरुवात होताच केळीचे दर घसरले आहेत. दराच्या तफावतीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

हे ही वाचा सविस्तर: Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळीचे पुन्हा संकट; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकेळीफळेबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड