सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त आहेत. तर, दुसरीकडे बटाटा, वांगी यांची आवक चांगली आहे. सध्या लग्नसराईमुळे ही बटाटा-वांग्याना अधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील आठवडाभरापासून बटाट्याची आवक वाढली आहे. परंतु लग्नसराई इतर समारंभामुळे वांगी-बटाट्यांना मागणी आहे. गेल्या सात दिवसांत २,२३३ क्विंटल दरम्यान बटाट्याची आवक झाली असून त्यास सरासरी दर १७०० ते २७०० दरम्यान दर मिळाला आहे.
मागील चार दिवसात केवळ १७० क्विंटल वांग्यांची आवक झाली असून दर सरासरी दर ७०० ते ३००० दरम्यान दर मिळाला आहे. लग्नसराई व इतर कार्यक्रमांमुळे सर्वच भाजीपाला आणि लिंबू काकडीला मागणी वाढली आहे.
बटाट्याला मागणी
सध्या बटाटा, काकडीला बाजारात मागणी आहे. पुरवठा कमी होत असल्याने मागील महिन्याच्या सुरुवातील भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे.
अधिक वाचा: भूमी अभिलेख विभागाकडून जमीन खरेदी-विक्रीच्या नोटीसा आता पोस्टाने होणार घरपोच