चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली.
तर बटाट्याची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली. टोमॅटो, गवार, वांगी, कोबी, फ्लॉवरची आवक वाढूनही भाव वधारले.
पालेभाज्यांची आवक कमी होऊनही भाव गडगडले आहेत. जनावरांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल ५ कोटी ६० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ११,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ६,००० क्विंटलने वाढल्याने कांद्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवर आला.
बटाट्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली. गेल्या आठवडचाच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने कमी झाल्याने बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवर गेला.
लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने वाढूनही लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ४२५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार ५०० रुपयांपासून ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
बटाटा
आवक - १,२५० क्विंटल.
भाव १) २,००० रुपये.
भाव २) १,५०० रुपये.
भाव ३) १,२०० रुपये.
कांदा
आवक - ११,५०० क्विंटल.
भाव १) १,४०० रुपये.
भाव २) १,१०० रुपये.
भाव ३) ८०० रुपये.
अधिक वाचा: २० गुंठ्याच्या पेरू लागवडीतूनही होता येतंय लखपती; तरुण शेतकरी विक्रमची यशकथा