Join us

Bedana Bajar Bhav : तासगाव बाजार समितीत नवीन हिरव्या बेदाण्यास मिळाला रेकॉर्डब्रेक दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:51 IST

तासगाव कृषी उत्पन्न बाजार  समितीत शनिवारी झालेल्या बेदाणा सौद्यात हिरव्या बेदाण्यास किलोला रेकॉर्डब्रेक ६५० रुपये दर मिळाला.

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार  समितीत शनिवारी झालेल्या बेदाणा सौद्यात हिरव्या बेदाण्यास किलोला रेकॉर्डब्रेक ६५० रुपये दर मिळाला.

भूपाल पाटील यांच्या धारेश्वर ट्रेडिंग कंपनी अडत दुकानात शेतकरी नागाप्पा शरणाप्पा हाडगे (रा. बेळुडगी, ता. जत, जि. सांगली) यांच्या हिरव्या बेदाण्यास ६५१ रुपये दर मिळाला.

सौद्यास खरेदीदार कौस्तुभ हिंगमिरे, पनू सारडा, जगन्नाथ घणेरे, सुनील हडदरे, विनित बाफना, सतीश माळी, बबलू पाटील, सुदाम माळी, किरण बोडके, मनोज मालू, ओंकार पिंपळे, विठ्ठल पाटील, राहुल बाफना, खरेदीदार, व्यापारी महाराष्ट्र व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

सरासरी प्रतिकिलो दरहिरवा बेदाणा - रु. २१० ते ६५१पिवळा बेदाणा - रु. १८० ते २५५काळा बेदाणा - रु. ८० ते १५०

तासगाव बाजार समितीत उच्चांकी दर मिळत आहे. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा तासगाव बाजारपेठेत सौद्यामध्ये विक्रीसाठी आणावा. - युवराज पाटील, सभापती

अधिक वाचा: Khodwa Us : उसाचा खोडवा ठेवणार असाल तर ह्या ६ गोष्टी करू नका; वाचा सविस्तर

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डसांगलीशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती