Lokmat Agro >बाजारहाट > Bedana Market : पंढरपूर बाजार समितीत बेदाणा दर तेजीत; ६७ कोटी रुपयांची उलाढाल

Bedana Market : पंढरपूर बाजार समितीत बेदाणा दर तेजीत; ६७ कोटी रुपयांची उलाढाल

Bedana Market : Raisins prices rise in Pandharpur Market Committee; Turnover of Rs 67 crore | Bedana Market : पंढरपूर बाजार समितीत बेदाणा दर तेजीत; ६७ कोटी रुपयांची उलाढाल

Bedana Market : पंढरपूर बाजार समितीत बेदाणा दर तेजीत; ६७ कोटी रुपयांची उलाढाल

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ७०१ रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड व उपसभापती राजूबापू गावडे यांनी दिली.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ७०१ रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड व उपसभापती राजूबापू गावडे यांनी दिली.

शेअर :

Join us
Join usNext

पंढरपूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ७०१ रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड व उपसभापती राजूबापू गावडे यांनी दिली.

पार्श्वनाथ ट्रेडर्स प्रो. स्वप्नील कोठाडिया यांचे अडत दुकानावर अभिजीत राजेंद्र डोंगरे (रा. आष्टी, ता. मोहोळ) यांच्या बेदाणा या शेतीमालास ७०१ रुपये प्रति किलो उच्चांकी दर मिळाला. या मालाची मनोहर सारडा यांनी उच्चांकी दराने खरेदी केला.

शेतकरी अभिजीत राजेंद्र डोंगरे (रा. आष्टी, ता. मोहोळ) व अडते स्वप्नील कोठाडिया यांचे माजी आ. प्रशांत परिचारक, बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड व युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेशराव परिचारक यांनी समक्ष बेदाणा मालाची पहाणी करून शेतकरी व अडते व्यापारी यांचे कौतुक केले.

सध्या बेदाण्याची आवक चांगली असून, दर चांगला मिळत असल्याने शेतकरी माल विक्रीसाठी पंढरपूर बाजार समितीस प्राधान्य देत आहेत. असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक सोमनाथ डोंबे, यासीन बागवान, महादेव लवटे, महादेव बागल उपस्थित होते.

६७ कोटी रुपयांची उलाढाल
बेदाण्याला ५० ते ७०१ रुपये व सरासरी २५० रुपये प्रति किलो दर निघाला. बेदाण्याची सुमारे २६७ गाड्यांची आवक होऊन बेदाणा २४० गाड्यांची विक्री झाली. या सौद्यामध्ये एकूण ६७ कोटी रुपयांची उलाढाल बाजार समितीमध्ये झाली. बेदाणा आवक चांगली असून खरेदीदार व्यापारी मोठ्या संख्येने येत असल्याचे बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी सांगितले.

अधिक वाचा: अल्पमुदत पीक कर्जावरील व्याज सवलतीसाठी १६५ कोटीचा निधी आला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

Web Title: Bedana Market : Raisins prices rise in Pandharpur Market Committee; Turnover of Rs 67 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.