Lokmat Agro >बाजारहाट > Bhajipala Bajarbhav: २० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? वाचा सविस्तर

Bhajipala Bajarbhav: २० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? वाचा सविस्तर

Bhajipala Bajarbhav: How does okra costing Rs 20 become Rs 100 per kg? read in detail | Bhajipala Bajarbhav: २० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? वाचा सविस्तर

Bhajipala Bajarbhav: २० रुपयांची भेंडी १०० रुपये किलो कशी होते? वाचा सविस्तर

शेतातल्या भाज्या आणि ग्राहकाच्या ताटात आलेली भाजी यांच्या किमतीत जमीन अस्मानाचा फरक असतो. बाजार घटकांचा वेध घेणारी मालिका भाग-१

शेतातल्या भाज्या आणि ग्राहकाच्या ताटात आलेली भाजी यांच्या किमतीत जमीन अस्मानाचा फरक असतो. बाजार घटकांचा वेध घेणारी मालिका भाग-१

शेअर :

Join us
Join usNext

नामदेव मोरे
व्यापाऱ्यांना ती भेंडी तो २० ते ३६ रुपये किलो या दरम्यान विकतो. मात्र, तीच भेंडी आपल्या घरात येताना १०० रुपये किलो होते. मधल्यामध्ये दलालांनी ७० ते ७५ रुपये किलोमागे मारलेले असतात. काबाडकष्टाने भाज्या पिकविणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात कवडीमोल भाव पडत असतो, दलालांची साखळी याला कारणीभूत असते.

शेतकरी शेतात पिकवलेली भेंडी मुंबईत आणतो. प्रत्येक भाजीच्या बाबतीत हेच होत आहे. शेतकरी कष्ट करुन भाजीपाला पिकवतो. गाडीघोडे करुन मुंबईला आणतो. मात्र जेव्हा त्याच्या हातात पैसे पडतात तेव्हा केलेल्या कष्टाची दलालांनी कशी माती केली हे त्याच्या लक्षात येते.

हतबलपणे मिळालेले पैसे घेवून जाण्याशिवाय त्याच्या हातात काहीही उरत नाही. मुंबईकर देखील हीच भाजी एसी मॉलमध्ये जावून चढ्या दराने विकत घेतात तेव्हा आपला खिसा कसा कापला गेला हे त्यांनाही कळत नाही.

पावसाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो १०० ते १२० रुपये किलो दराने विकला जात आहे. बाजार समितीत मात्र टोमॅटोला ३५ ते ६० रुपये दर आहे. यामधूनही वाहतूक, तोलाई, हमालीचा खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातामध्ये अत्यंत कमी पैसे मिळत आहेत.

हाच टोमॅटो बाजार समितीपासून एक किलोमीटर अंतरावर दुप्पट दराने ग्राहकांना खरेदी करावा लागतो आहे. सध्या सर्वच भाजीपाल्याच्या दरांमध्ये हा फरक पाहावयास मिळतो आहे.

• शेतकरी भाजीपाल्यांची लागवड करतो. २ ते ३ महिने दिवसरात्र मेहनत करून पीक तयार करतो. यानंतर बाजार समितीपर्यंत वाहतूक करून त्याला जो भाव मिळतो, त्याच्या दुप्पट भावाने ग्राहकांना भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.
• भाजीपाला पिकविण्यासाठी येणारा खर्च वजा केला तर विक्रीतून मिळालेल्या पैशातून फारसा लाभ मिळत नाही.
• कधी कधी उत्पादन खर्चही निघत नाही. कृषी व्यापारामध्ये असलेल्या मध्यस्थांच्या मोठ्या साखळीमुळे ही दरवाढ होत असल्याचे चित्र आहे.

प्रतीकिलोला बाजार समिती व किरकोळ बाजारातील भाजीचे दर व शेतकऱ्याच्या हातात येणारी रक्कम
वस्तू - बाजार समिती - प्रत्यक्ष शेतकरी - किरकोळ
कांदा - २४ ते ३० - १८ ते २३ - ५० ते ६०
लसूण - ९० ते २२० - ७० ते १७० - ३६० ते ४००
भेंडी - २० ते ३६ - १५.५० ते २८ - १००
गवार - ४५ ते ६५ - ३५ ते ५० - १०० ते १२०
दुधी भोपळा - १६ ते २४ - १२.५० ते १८.५० - ६० ते ७०
फरसबी - ६० ते ८० - ४७ ते ६२ - १२० ते १४०
फ्लॉवर - १२ ते १८ - ९ ते १५ - ६० ते ८०
कारली - २० ते ३० - १५.५० ते २३ - ६० ते ८०
कोबी - १२ ते १८ - ९.५० ते १४ - ६० ते ७०
ढोबळी मिर्ची - २५ ते ३० - १९.५० ते २३ - ८० ते १००
शेवगा शेंग - ६० ते ८० - ४७ ते ६२ - १२० ते १४०
टोमॅटो - ३५ ते ६० - २७ ते ४७ - १०० ते १२०
तोंडली - ४० ते ७० - ३१ ते ५४ - १००
वाटाणा - ८० ते १०० - ६२ ते ७७ - २००

Web Title: Bhajipala Bajarbhav: How does okra costing Rs 20 become Rs 100 per kg? read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.